वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गर्जतो महाराष्ट्र !!
वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गर्जतो महाराष्ट्र !!
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गौरव दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी गौरवभाषा दिनाचा उत्साह संचारलेला असतो. शुभेच्छांचा वर्षाव होत असतो आणि ही गोष्ट महाराष्ट्राच्या अभिमानाची आहे. अशा या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वसई शहर महानगरपालिका ता. वसई, जिल्हा पालघर यांनी मराठी भाषेचा गौरव करणारे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
प्रभाग समिती "एच" नवघर, डॉक्टर के. ब. हेडगेवार वाचनालय आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित "गर्जतो मराठी" हा महाराष्ट्राची लोक परंपरा जपणारा एक आगळावेगळा नृत्यअविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेला आहे. कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन संजय बलसने यांनी केलेले आहे. मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ तीस वाजेपर्यंत साईनगर मैदान वसई रोड येथे कार्यक्रम सादर होईल. कार्यक्रमात विविध नृत्य अविष्कार पाहायला मिळणार आहेत.
सदरचा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य राहणार आहे. वसई विरार महानगरपालिकेने सर्व नागरिकांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले आहे. कार्यक्रमाचे आयोजन मा. निलेश म्हात्रे प्रभारी सहाय्य आयुक्त प्रभाग समिती एच नवघर, मा. विजयकुमार द्वासे उप आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी प्रभाग समिती एच नवघर, निमंत्रक संघरत्ना खिल्लारे उप आयुक्त वाचनालय, मा. रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त, मा. श्री अनिल कुमार पवार (भा.प्र.से.) आयुक्त तथा प्रशासक वसई विरार महानगरपालिका यांनी केले आहे.
असे प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे.