वसई विरार महापालिका आयुक्त प्रशिक्षणासाठी, वित्तीय अधिकार नसल्याने अतिरिक्त आयुक्तापुढे पेच !!

वसई विरार महापालिका आयुक्त प्रशिक्षणासाठी, वित्तीय अधिकार नसल्याने अतिरिक्त आयुक्तापुढे पेच !!

       वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी एक महिन्यासाठी मसूरी येथे रवाना झालेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्तांकडे भार सोपविण्यात आलेला आहे. मात्र त्यांच्याकडे वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार नसल्याने मोठा पेच निर्माण झालेला आहे. महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त अनिल कुमार पवार यांची भारतीय प्रशासन सेवेमध्ये (आयएएस) पदासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

       यासाठी त्यांना पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेले आहे. 19 फेब्रुवारी ते 19 मार्च प्रशिक्षण चालू राहणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्यांना कार्यमुक्त केले असून त्यांच्या जागी प्रशासकीय कारभार अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. मात्र वित्तीय आणि महत्त्वाचे प्रशासकीय अधिकार वगळून त्यांना हा कार्यभार सोपविण्यात आल्याने मात्र मोठी अडचण निर्माण झालेली आहे. वित्तीय अधिकार नसल्याने त्यांना कोणत्याही प्रकारच्या खर्चाचे काम घेता येणार नाही. या महिन्यांची ठेकेदारांची बिलेही थकित राहणार आहेत.

       31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार असल्याने प्रस्तावित कामे रखडणार आहेत. शासकीय अनुदानातून प्रस्तावित कामे करता येणार नसल्याने सरकारी अनुदानही परत जाणार आहेत. आगामी पावसाळ्या आधी येणाऱ्या कामाचं नियोजन करता येणार नाही. त्यामुळे कामे कशी करायची हा प्रश्न पडला आहे.

       त्यात या पालिकेत प्रशासकीय अधिकार असल्याने महानगरपालिकेच्या कामाचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.


Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week