
संजय जामदार संभाजी ब्रिगेडवर संतापले !
संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याला विरोध केल्यानंतर, मनसे उपाध्यक्ष संजय जामदार यांनी तीव्र प्रतिकिया दिली, जामदार म्हणाले संभाजी राजे व शिवाजी राजे हि काय कुणाची जहागीर नाही, शिवमुद्रा हे आमचे आदर्श आहे उलट संभाजी ब्रिगेडला याचा अभिमान वाटला पाहिजे, झेंड्यावरच्या शिवमुद्रेचे पावित्र्य जपा, झेंडा कोणाच्या पायदळी येणार नाही याची काळजी घ्या हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवर्जून सांगितले आहे, त्यामुळे त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, प्रेरणा देणारे प्रतीक म्हणून हि राजमुद्रा मनसेने घेतलेली आहे,
संभाजी ब्रिगेड संख्येने फार कमी आहेत, चार टकली जमा होऊन पब्लिसिटी स्टंट करण्याचा हा प्रयत्न ब्रिगेंड करत आहे, त्यांनी आयुष्यभर तेच तर केले !