परिपूर्ती.....
काल परवाचा एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, लेखकाने मोठ्या अगत्याने बोलाविले व पुस्तकप्रेमामुळे आम्ही हजर होतो.
बऱ्यापैकी उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. नेहमीप्रमाणे कुठेतरी कोपरा शोधून आम्ही आसनस्थ झालेलो.
दोन अडीच तास चाललेल्या कार्यक्रमात एक देखणं पुस्तक प्रकाशित होत होतं.
भाषणे ऐकण्याची
सवय असल्याने कुणालाही लांबलेल्या कार्यक्रमाचे विशेष काही वाटलेही नाही.
कार्यक्रम संपल्यावर आजूबाजूच्या मित्रमंडळींची दखल घेत लेखकाला भेटायला आम्ही पुढे सरकलो.
बराच वेळ उभा राहूनही भारावून गेलेल्या लेखक मित्राचे लक्ष वेधून घेणे आम्हाला काही जमत नव्हतं. आपल्या नवोदीत पुस्तकावर सही व फोटो देण्यात तो गुंतलेला.
बराच वेळ असंच उभा राहिल्यावर आम्हाला आमची चूक कळली तसे आम्ही बाहेर पळालो व पुस्तक विकत घेऊन आलो.
हातातलं आपलं ते पुस्तकरुपी बाळ पाहताच झेप घेऊनच लेखक महाशय आता आमच्यापाशी आले तसे पुस्तकावर सही व त्यांच्याबरोबरच्या फोटोंत आम्हीही सामावून गेलो. आमची परिपूर्ती झाली होती आणि त्यांचीही.
'गीत'
लेसली डायस