वसई कला क्रीडा महोत्सवात गॅलरी कोसळली 15 मुले किरकोळ जखमी !!

वसई कला क्रीडा महोत्सवात गॅलरी कोसळली 15 मुले किरकोळ जखमी !!

           वसईत सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवातील खोखो सामन्यात प्रेक्षक गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पंधराजण किरकोळ जखमी झाली. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जखमी खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. बहुतांश जखमी महिला खेळाडू होत्या.

             हे सर्व खेळाडू विरार येथील चिखल डोंगरी व अर्नाळा गावातील होते. वसई विरार महापालिका आणि कला क्रीडा महोत्सव वसई यांच्यावतीने वासीच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर 34 वा कला क्रीडा महोत्सव सुरू आहे. शुक्रवारी या कला क्रीडा महोत्सवाचा चौथा दिवस होता. मैदानावर विविध खेळांचे सामने रंगले होते. गोकुळ सामन्याच्या वेळी उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. गॅलरीवर अतिभार झाल्यामुळे साडेसातच्या सुमारास अचानक गॅलरी कोसळली. त्यात एकूण 15 जण जखमी झाले. यामध्ये खेळाडूंसह सामना बघण्यात आलेल्यांचा समावेश होता.

             सर्व जखमी खेळाडूंना वसई पारणका येथील महापालिकेच्या सर डी. एम .पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेत कोणीही गंभीर जखमी नव्हते. दोन जणांनी पोटात दुखत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांच्या एक्स-रे तपासणीत काहीही दिसून आले नाही. सर्व रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आले.

             अशी बातमी डॉक्टर डी. एम. पेटीट रुग्णालयाचे डॉक्टर असलम शेख यांनी दिली. वसईच्या आमदार जितेंद्र ठाकूर आणि भाजपाचे नेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. खो-खो चा सामना रंगतदार होता. त्यामुळे उत्साहात समर्थक प्रेक्षक जास्त संख्येने गॅलरीत चढले. त्यामुळे ही दुर्घटना घडली असे माझी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. यापुढे आम्ही आयोजनात अधिक काळजी घेऊ असेही यावेळेस शेट्टी यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर इतर सामने सुरळीत सुरू होते.


Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week