
कोणी घर देता का घर !!
स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई माया नगरीत आपले स्वत: चे घर व्हावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. त्यासाठी आयुष्य भराची पूंजी समर्पित करूनही विकासकाच्या माध्यमातून साकारण्यात येणा-या सदनिकेच्या धैर्य-धोरणाविषयी माहिती पुस्तकाद्वारे दाखविलेल्या आराखड्यानुसार सदनिका प्रत्यक्ष आकारात येणे बंधनकारक असूनही, सदनिका प्राप्त होण्यासाठी होत असलेली ससेहोलपट कितपत योग्य आहे? स्वप्नाचं घर स्वप्नातच राहणार नाही ना?
वाजवी किमतीत सर्व सुख-सोयीनी उपलब्ध सदनिका मिळेल अशी जाहिरातबाजी करूनही विकासकाकडून दाखविलेल्या जागेत सदनिकेचे बांधकाम न होताच पोबारा डाँ. बाबासाहेब आंबेडकर सम्यक निवास हव-क नोदणीकृत संस्थेच्या माध्यमातून अँड. आर.आर.पांडियन (चेबूंर) यांच्याकडून झाला.
दूसरीकडे केळवे रोड, जिल्हा पालघर याठिकाणी ओळखीच्या व्यतिमार्फत चेतन गांवड यांच्या मध्यस्थिने जागा घेऊन त्यावर घरकूल व्हावे यासाठी सन २०१३ पासून मिळकत जमा केली, विविध जागा दाखवून विविध कारणमिमांसा होऊनही अद्याप जागा ताब्यात देण्यास चेतन गांवड यांच्याकडून दिरंगाई होत आहे.
तर तिसरीकडे सर्वे नं. ५६/५, मौजे ममदापूर, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड श्री स्वामी समर्थ काँम्प्लेव-स येथील श्री. सुरेश विष्णु कदम, विकासक यांच्याकडे सन २०२२ ला ओळखीच्या माध्यमातून सदनिकेसाठी पैसे जमा करण्यात आले. प्रत्यक्षात सदनिकेचे कामकाज पूर्तत्वाला येईपर्यत योग्य नियम-निकष-अटी यांच्या अभावामुळे पाणी-वीज, सभोवतालची स्वच्छता व अन्य सुखसोयीचा कुठेच ठावठिकाणा दिसत नाही. विकासकाकडून काही बाबीची पूर्तता करून देण्यास होत असलेला विलंब-टाळाटाळ यामुळे सदनिकेचा ताबा घेण्यास-देण्यास योग्य विचाराची देवाण-घेवाण न होत असल्यामुळे संम्रभ निर्माण झाला आहे.
तर चौथ्या ठिकाणी टिटवाळा येथील सर्वे नं.११६, हिस्सा नं.२ ई, मौजे मांडा, ता.कल्याण, जि. ठाणे मे. पिंपळेश्वर कन्स्ट्रव-शन कंपनी कडील श्री. ओमप्रकाश पांडे/कमलेश तिवारी या विकासाकडे श्रीमती शारदा राजाराम परब यांनी सदनिकेची पूर्ण रव-कम अदा करूनही सदनिकेची चावी त्यांना दिली जात नाही. विज मिटर लावले जात नाही. आता तर विकासक त्यांचा फोनही उचलत नाही.
वरील सर्व प्रकरणे विचारात घेता विकासका कडून संबंधिताना होणारा मानसिक त्रास सहन करून घेणे, म्हणजेच क्षमा करणे व अश्याच प्रकारच्या फसवणकीस उत्तेजन देण्यासारखे आहे. भूक आहे तेवढे खाणे ही प्रवृत्ती, भूक आहे त्यापेक्षा खाणे ही विकृत्ती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून घराच्या स्वप्नासाठी ज्यांनी-ज्यांनी या सर्वाकडे आपली मिळकत गुंतविली, ही गुंतवणूकदाराची संस्कृत्ती आणि विकासकाकडून ही सर्व मंडळी फसविली जाणे ही विकृत्ती. याला वेळीच आळा बसणे गरजेचे आहे. अन्यथा समाजाला ही लागलेली कीड सर्वांना भस्मसात करून टाकल्याशिवाय राहणार नाही.
(सुनिल गोपाळ पांचाळ, लालबाग-परळ, मुंबई - ४०००१२)