
वसईत लवकरच चार रेल्वे उड्डाणपूल !!
वसई विरार शहरातही महारेल तर्फे चार नवे रेल्वे उड्डाणपूल (आरओबी ) बांधण्यात येणार आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या निर्मितीचे काम महारेलला (महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात एम. एम. आर. डी. ए. वसई विरार महापालिका आणि महारेल मध्ये त्रिपक्ष सामंजस करार करण्यात येणार आहे. या पुलाच्या निर्मितीनंतर वसई विरार शहर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून असून. शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या घरात आहे. मात्र शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यास होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आर ओबी) बांधण्याची संकल्पना समोर आली. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने शहरात चार उड्डाणपूलाचा प्रस्ताव तयार करून तो तो एम एम आर डी कडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळा (वसई), (आचोळे नालासोपारा), अल्कापुरी (नालासोपारा), आणि विराट नगर (विरार) या चार शहरांचा समावेश होता. त्यासाठी १५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र निधी अभावी उड्डाणपूलाचे काम रखडले होते. पालिकेकडून या उड्डाणपुलाचे काम केंद्र शासनाच्या सेतूभारातम योजनेतून करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर हे काम महापालिकेकडे सोपीविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकामाचे वित्त संचालक सुभाष कवडे यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली. चार उड्डाणपूल तयार झाल्यास पूर्व आणि पश्चिम वाहतूक मार्गावरील वाहतुकीची समस्या ५० टक्क्यांनी कमी होईल. असा विश्वास विश्वास वसई विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी व्यक्त केला आहे.