
श्रीकृष्ण केंद्रे यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्रदान !!
श्रीकृष्ण केंद्रे यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्रदान !!
शिव मुंबई येथील जोगळेकरवाडी मनपा हिंदी शाळेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, श्रीकृष्ण कुंडलिकराव केंद्रे यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित आणि सर्वोच्च आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार २०२२-२३ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा, मुंबई येथे प्रदान करून त्यांच्या कोरोना काळातील ड्युटी तसेच उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
केंद्रे हे मूळचे मराठवाड्यातील सततच्या दुष्काळी आणि डोंगरी भागातील मंठा तालुक्यातील तळेगांव येथील शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. त्यांनी २००९ साली बृहन्मुंबई महापालिकेत प्रशिक्षक पदावर नोकरी मिळवली. १४ वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी आपली शैक्षणिक अहर्तता वाढवत समाजातील वंचित घटकांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छ्ता, पूरग्रस्तांना मदत उपक्रमा बरोबरच विपुल प्रमाणात मराठी काव्य लेखन केलेले आहे. शेतकरी कुटुंबातील मुलाने आपल्या मेहनतीने अत्यंत कमी वयात फार मोठे यश प्राप्त केले आहे. त्याकरिता त्यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक होत आहे.