आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अधीक्षकाकडून बेदम मारहाण !!

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अधीक्षकाकडून बेदम मारहाण !!

     वसई नजीकच्या, कामाने येथील आश्रम शाळेतील अधीक्षकांचा विद्यार्थ्यांना लाथा, बुक्याने मारून, बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवी इयत्तेत हा विद्यार्थी शिकत असून त्याला झालेल्या मारहाणीबाबत, परिसरातून रोष व्यक्त होत आहे.

             नितीन धनाजी  मागी वय वर्ष (१४) हा रात्रीच्या सुमारास वस्तीगृहात दंगामस्ती करीत होता. या कारणास्तव ही मारहाण झाल्याची सांगण्यात येते. अधीक्षक पृथ्वी बोरसे यांनी 2 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास ही मारहाण केली. मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याला अधीक्षकांनी रामपूर (वरठा पाडा) डहाणू येथे त्याच्या घरी पाठवले. सात दिवसापासून विद्यार्थी त्याच्या घरीच होता. त्याच्यावर उपचार सुरू नव्हते, म्हणून त्याची प्रकृती खालावली. या बाबत सार्वजनिक कार्यकर्ते यांना माहिती मिळताच, त्यांनी मुलाची व कुटुंबीयांची भेट घेतली. नंतर हा प्रकार उघडकीस आला. डहाणू प्रकल्प अधिकारी यांनी आश्रम शाळेतील जे दोषी कर्मचारी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

         काही दिवस उलटून गेल्याने इतर ठिकाणी दुखापत आहे किंवा नाही हे निष्पन्न झालेले नाही.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी