आषाढी एकादशी !
आषाढी एकादशी देवश्यनी एकादशी ही हिंदू पंचगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशी दिवशी लाखो संख्या वारकरी पंढरपूर मध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी दाखल होतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पाई चालत जातात हिलाच आषाढी वारी म्हणतात.
देवश्यनी एकादशी बद्दल असे म्हणले जाते की भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात अनेक ठिकाणी शाळेमध्ये महाराष्ट्र वेशभूषा करून आषाढी एकादशीनिमित दिंडी आयोजित केली जाते तसेच या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.