
मुक्तांगण शाळेतील प्रवेशासाठी विद्यार्थी संख्येची मर्यादा वाढवण्यासाठी आमदार सुनिल शिंदे यांचे मा. शिक्षणमंत्र्यांना पत्र..!
मुक्तांगण शाळेतील प्रवेशासाठी विद्यार्थी संख्येची मर्यादा वाढवण्यासाठी आमदार सुनिल शिंदे यांचे मा. शिक्षणमंत्र्यांना पत्र..!
मागील १५ वर्षांपासून मध्यमवर्गीय कामगार विभागात सुरु असलेल्या मुक्तांगणच्या अनेक शाखामधून उत्तम व दर्जेदार शिक्षण अत्यंत माफक शुल्क आकारूण देण्यात येत आहे. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी वर्षभर शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे येथील विद्यार्थ्यांच्या कला, क्रिडा गुणांना वाव मिळत असून त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. शाळेच्या या प्रतिष्ठेमुळे अनेक पालकांचा या शाळेत प्रवेश घेण्याकडे प्राधान्य आहे.
आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळण्याबाबत अनेक पालक उत्सुक आहेत, परंतु प्रवेश देण्याबाबत विद्यार्थी संख्येची मर्यादा व वर्ग खोल्याबाबत असलेल्या शासकीय नियमांमुळे १५ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरही विभागातील किमान १०० हून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून अद्याप वंचित आहेत.
लवकर या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास वर्ष फुकट जाऊन शैक्षणिक नुकसान होण्याची धास्ती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
या सर्व परिस्थितीचा सहानभूतीपूर्वक विचार करून विद्यार्थी संख्या व वर्ग खोल्याबाबत असलेल्या शासकीय नियम व नियमावली मध्ये विशेष बाब म्हणून शिथिलता आणावी व प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग अथवा प्रवेशासाठी उचित सहकार्य करण्यासाठी आमदार मा. सुनिल शिंदे यांनी पत्राद्वारे शिक्षणमंत्री. मा. श्री. दीपक केसरकर यांना विनंती केली आहे.
Bया संदर्भात आज आमदार सुनिल शिंदे यांनी मनपा शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाल यांची भेट घेऊन अद्याप प्रवेशापासून वंचित असलेल्या सुमारे १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा केली.