
शक्ती प्रदर्शन मतदान मध्ये व्हावे !!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील काही माजी लोकप्रतिनिधी शिंदे गटात गेल्यामुळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान आदित्य यांनी केले होते. त्यानंतर मी ठाण्यातून लढण्यात तयार आहे. असे आव्हान केले आहे. तरी वरळी येथे शिंदे गटा तर्फे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा काही संस्थान तर्फे जाहीर सत्कार करून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तरी असे शक्तिप्रदर्शन दाखवण्यापेक्षा मतदार संघा मध्ये उमेदवाराचे आणि पक्षाचे कार्य असेल तर मतदारांमुळेच विजय होणार आहे. म्हणून शक्ती प्रदर्शन पेक्षा लोकशाहीतील मतदारांची शक्ती दाखवावी.