मुंबईत स्वच्छतेत वरळी नंबर वन !

मुंबईत स्वच्छतेत वरळी नंबर वन !

वरळीसह संपूर्ण मुंबई कचरामुक्त, खड्डेमुक्त व रोगराईमुक्त करण्याचा संकल्प शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री, युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांनी केला असून नुकत्याच झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मुंबईतील सर्वात स्वच्छ वॉर्ड म्हणून जी-साऊथ वॉर्डला पुरस्कार देण्यात आला. तसेच सर्वात स्वच्छ मंडई म्हणून वरळीतील खरुडे मंडईची निवड करण्यात आली. 

 मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले कि,वरळी विभागातील नगरसेवक म्हणून मला याचा खूप आनंद झाला. वरळीला हा बहुमान मिळण्यामागचे सर्व श्रेयही जी साऊथ वॉर्डच्या सर्व कर्मचारी आणि वॉर्ड ऑफिसर यांचे आहे, तसेच आपला परिसर स्वच्छ  ठेवण्यामागे विभागातील जनतेचा देखील तेवढाच सहभाग आहे, वरळीकरांचे आभार.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week