मुंबई पोलिसांना दरमहा पगारातून प्रवास भत्ता देण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी - आमदार श्री. सुनिल शिंदे यांची अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे मागणी !!

मुंबई पोलिसांना दरमहा पगारातून प्रवास भत्ता देण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी - आमदार श्री. सुनिल शिंदे यांची अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे मागणी !!

       राज्यातील इतर पोलिसांप्रमाणे मुंबई पोलिसांनाही प्रवास भत्ता मिळण्याबाबतची वाढती मागणी लक्षात घेवून तत्कालीन पोलीस आयुक्तांनी माहे जून २०२२ पासून प्रवास भत्ता मुंबई पोलीसांच्या पगारात देण्याबाबत आदेश दिले होते. परंतु शासन मंजुरी अभावी मुंबई पोलिस प्रवास भत्त्यापासून आजमितीपर्यंत वंचित आहेत.  परिणामी मोफतचा बस प्रवास हि बंद करण्यात आल्याने मुंबई पोलिसांना स्वखर्चाने बसची तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.

      यापूर्वी पोलिसांना बेस्ट प्रवास मोफत असल्याने प्रवास भत्ता देण्यात आला नाही. परंतु बहुतांश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खाजगी वाहन, रेल्वेने प्रवास करीत असल्याने त्यांनी अन्य राज्यांप्रमाणे प्रवास भत्ता देण्याची मागणी केली आहे. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही केवळ एक तृतीयांश मुंबई पोलिसांची देयके बेस्टकडून येत असल्याचे समोर आले. म्हणून त्यांनी पोलिसांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शासनाने सदर प्रकरणी अद्यापही मंजुरी दिलेली नसल्याने मुंबई पोलिसांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

         यास्तव मुंबई पोलिसांना दरमहा पगारातून प्रवास भत्ता देण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी विशेष उल्लेख सुचनेद्वारे आमदार श्री. सुनिल शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाकडे केली.

(सौजन्य - प्रसाद सावंत )


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे