
वरळी भाजपा तर्फे गणेशभक्तांना मोफत बस सेवा !!
गणपती अगदी तोंडावर आलेले आहेत संपुर्ण महाराष्ट्र गणेश आगमनाच्या तयारीला लागला आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या महामारीने सर्व उत्सवावर पाणी फिरलं होते. परंतु ह्या वर्षी गणेशोत्सव जोमाने साजरा करण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत.
मुंबई म्हटलं म्हणजे चाकरमानी, लाखो लोक या रोज या मुंबापुरीत पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात आणि त्यातल्या त्यात कोकणवासी तर मुंबईत भरपूर आहेत. वर्षातून एकदा १०, १२ दिवसाची सुटी काढून आपल्या कुटुंबासहित गौरीगणपतीच्या सणाला गावी जात असतात, सणाला गावी जाणारी हजारो कुटुंब असतात. परंतु गावी जाणाऱ्या लोकांची इतकी वर्दळ असते की एसटी बसमध्ये रिसर्वेशन मिळण मुश्किल होऊन जाते प्रायव्हेट भाड्याची वाहन करून गावी जावं लागत.
म्हणून गणपतीक गावक जाउक साठी खास एसटी बसेस ची व्यवस्था भाजपा वरळी विधानसभेतर्फे करण्यात आली आहे. वरळीतील चाकरमान्यांना गावी गणपतीला जाता यावे ह्यासाठी दिनांक २८ ऑगस्ट २२ रोजी सायंकाळी जाबोरी मैदान येथून रत्नागिरी, सावंतवाडीसाठी, बसेस सोडण्यात येणार आहेत. (सदर सेवा निशुल्क असणार आहे) तरी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांनी
तानाजी बेडेकर(वार्ड अध्यक्ष१९५ )
मो न. 9867319522
जितेंद्र झा (वार्ड अध्यक्ष१९६)
9324855229
यांना संपर्क करावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.