लोअर परळ उड्डाणपुलाचे रखडलेले काम तसेच आगामी गणेशोत्सवकाळातील लोअर परळ, लालबाग, करिरोड परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्न आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केले !!
लोअर परळ उड्डाणपुल मागील काही वर्षांपासून बंद असून त्यांच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यास्तव याउड्डाणपूलाच्या कामास गती देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत.
• आगामी काळात गणेशोत्सवादरम्यान लालबाग, परळ परिसरात गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे लोअर परळ, करीरोड रेल्वे स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होऊन भीतीदायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपूर्वी भाविकांची व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन, पादचाऱ्यांसाठी मार्गिका याबाबत सोयीस्कर मार्ग काढावा. गर्दीमुळे होणारी संभाव्य गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी अधिवेशनात उपस्थित केली.
(सौजन्य - प्रसाद सावंत)