कबड्डीमहर्षीं स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचे प्रेरणादायी स्मारक उभारावे आमदार सुनिल शिंदे यांची अधिवेशनात मागणी !!

        कबड्डी महर्षीं स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचे कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारात खूप मोठे योगदान होते, ते महाराष्ट्राच्या कबड्डी खेळाचे आधारस्तंभ होते व यांच्यामुळेच कबड्डीला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळाली. बुवा साळवींच्या प्रयत्नांमुळे कबड्डीचा आंतरराष्ट्रीय एशियन गेम्स मध्ये प्रवेश झाला, आणि या स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवता आले. १५ जुलै हा दिवस बुवा साळवी यांचा जन्मदिवस ‘महाराष्ट्र कबड्डी दिन’ या नावाने साजरा करण्यात येतो. कबड्डीसाठी आयुष्य वेचलेल्या या उत्तुंग व्यक्तीमत्वाचे वरळी, परळ किंवा लालबाग यांसारख्या कामगार भागात प्रेरणादायी स्मारक उभारावे अशी पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे मागणी विधानपरिषद आमदार श्री सुनील शिंदे यांनी केली.

(सौजन्य - प्रसाद सावंत)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week