पर्यावरणपूरक गणेशविसर्जनसाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांची संख्या कमी न करता ती आणखी वाढवण्यासाठी आमदार सुनिल शिंदे यांची मा. आयुक्तांना पत्राद्वारे सूचना !!

पर्यावरणपूरक गणेशविसर्जनसाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांची संख्या कमी न करता ती आणखी वाढवण्यासाठी आमदार सुनिल शिंदे यांची मा. आयुक्तांना पत्राद्वारे सूचना !!

       तब्बल २ वर्षानंतर राज्यातील कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सध्या सण-उत्सवही धुमधडाक्यात साजरे होत आहेत. मुंबई महानगरीचा मानबिंदू असलेला गणेशोत्सव सोहळा देखील दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. १०  दिवसांचा गणेशोत्सव यंदा ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निर्बंध उठवल्यानंतर हा उत्सव यावर्षी दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरात हा सण कोणत्याही विघ्नाविना साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येते. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील या कृत्रिम तलावांचा लाभ लाखो सार्वजनिक, तसेच घरगुती भाविकांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी होत असतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा यावर्षी शहरातील कृत्रिम तलावांची संख्या कमी करण्याचा मानस आहे. त्यामुळे मुंबईकर जनतेला गणेश विसर्जनासाठी समुद्र किनारा गाठावा लागणार आहे. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांवर देखील अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.

        यास्तव पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची संख्या कमी न करता वाढविण्यात यावी, हि विनंती आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.

(सौजन्य - प्रसाद सावंत)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week