आदित्य ठाकरेंच्या वरळीत बंडखोरी होऊ शकते ? निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी !!

आदित्य ठाकरेंच्या वरळीत बंडखोरी होऊ शकते ? निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी !!

      शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आमची शिवसेना वाचवा !

       सद्या वरळीत कोणी निष्ठावंत शिवसैनिक राहिले नाहीत का ? जे अडीच वर्षांपूर्वी वरळीतील शिवसेना संपवायची भाषा करून शिवसेनेत आले. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना येवढी पदे का दिली आहेत? शिवसेनेसाठी जीवाचे रान करणारा निष्ठावंत शिवसैनिक काय फक्त झेंडे पकडणार काय ? आणि बाहेरून आलेल्याना किती पदे देणार. त्यांना अजून शिवसेना कळली नाही आणि कधी कळणार पण नाही ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या शिवसेनेत आले आहेत. निष्ठावंत शिवसैनिकाला साधे गटप्रमुख पण कोण करत नाही आणि दुसरे पक्ष बदलून आलेल्याना येवढी पदे - हि लिस्ट बघा      

१) सचिन अहिर : विधानपरिषद आमदार, शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेना सरचिटणीस, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख -  (२०१४ ला वरळीतून पराभूत झाल्यावर स्वतःचे राजकीय पुनर्वसन होण्यासाठी राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत आले.) 

२) मनोज जामसुतकर : उपनेता, चिटणीस-भाकासे (काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश) 

३) हेमांगी वरळीकर : माजी उपमहापौर, नगरसेविका (मनसेतून शिवसेनेत प्रवेश) 

४) हरिष वरळीकर : उपविभागप्रमुख (मनसेतून शिवसेनेत प्रवेश) 

५) राजू अडसूळ : सोशल मीडिया समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश)

६) बाळा सावर्डेकर : शाखा समन्वयक, सहचिटणीस-भाकासे (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

७) राजन लाड : चिटणीस-भाकासे (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

८) प्रितम साळवी - भाकासे (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश)

९) सुनिल (लाली) अहिर : बेस्ट समिती सदस्य (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१०) अनिता नायर : महिला शाखाप्रमुख (राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश) 

११) रूणाल लाड : शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१२) किरण गावडे : शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१३) अनिल मेढेकर : शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१४) विनोद खोब्रागडे : शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१५) संतोष जाधव : शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१६) राजवी लाड : युवासेना सहसचिव, रेल्वे (DRUCC) सदस्यपदी नियुक्ती (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१७) सचिन साळवे : युवासेना शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१८) तुषार महाले : युवासेना मुंबई समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

१९) स्वप्निल नितनवरे : वरळी विधानसभा चिटणीस (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

२०) सचिन कांबळे : युवासेना वरळी विधानसभा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

२१) गिरीश कुंभार : युवा शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

२२) संतोष सरोदे : युवासेना वरळी विधानसभा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश) 

२३) राहुल विनेरकर : युवा शाखा समन्वयक (राष्ट्रवादीतून जून २०१९ ला शिवसेनेत प्रवेश)

       वर पदे दिलेल्यापैकी एकपण शिवसैनिक नाही ते फक्त कोणाचे तरी समर्थक आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत यातील ३/४ नगरसेवक पण होतील आणि राहिलेले शाखाप्रमुख, हे जर असेच चालू राहिलेतर एक दिवस आपल्या शाखासुद्धा हेच चालवतील व बाळासाहेबांच्या विचाराने वर्षानुवर्षे झटणारा निष्ठावंत शिवसैनिक शाखेच्या बाहेर असेल. वरिष्ठांनी याचा विचार करावा व निष्ठावंतांना न्याय द्यावा.

          अशी नाराजी सोशल मीडिया वरून व्यक्त केली जात आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे