नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई येथील तीन माळ्याची इमारत कोसळली !!

नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई येथील तीन माळ्याची इमारत कोसळली !!

         नेहरू नगर पोलिस ठाणे हद्दीतील नाईक नगर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई ही तळ मजला + तीन माळ्याची इमारत दिनांक 27 /06/2022 रोजी 23:30 वाजता सुमारास कोसळली असून सदर अपघाता दरम्यान एकूण 19 रहिवाशांचा मृत्यू व पंधरा जण जखमी झाले आहेत.

        सदर इमारत हे राहण्यास धोकादायक असल्याचे महानगरपालिका यांनी यापूर्वी घोषित केले होते तरीदेखील घर मालक व इतर अनोळखी इसमाने भाडेकरू इसमांना राहण्यास दिली व त्यांचे मृत्यूस तसेच त्यांना जखमी होण्यास कारणीभूत झाले म्हणून इसम नामे श्रीमती रजनी राठोड, श्री किशोर नारायण चव्हाण, श्री बाळकृष्ण राठोड व इतर घर मालक तसेच इसम नामे दिलीप विश्वास यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 420/22 कलम 304(2), 308, 338, 33, 34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे