किसी को भी कुछ भी नही बोलने का !

किसी को भी कुछ भी नही बोलने का !

      (वार्ताहर - प्रद्युमन देशपांडे) हां - हां म्हणता दिवस संपला.. संध्याकाळ झाली . 

      तो बाहेर पडतोय..  बार रेस्टाॕरेंटवर जाऊन एक मॕकडावल विस्कीची एक क्वार्टर पोटात उतरवून घेतली. तेथून बाहेर पडला.. गाड्यावर दोन अंडाबुर्जी येथेच्छ खाल्ली . पोटभर खाऊन झाल्या नंतर परत एक क्वार्टर पार्सल घेतली, आणि कुठे ही न थांबता तो रुमवर येतोय...

      रात्रीच्या तीन चा आलाराम लावून खोलीतल्या बेडवर स्वतःला पसरवून दिलं. . .

जसे ही तीन वाजले मोबाईल फोनवरचा आलाराम वाजला. तो खाडकन् उठला..तोंडावर पाणी मारून फ्रेश झाला . पार्सल आणलेली क्वार्टर परत लोड केली. 

आणि..अॕटो ड्रायव्हर चा अॕपराॕन अंगावर चढवून खोलीच्या बाहेर पडला .

जीवदाणी मंदिर..पैठा रोड 

    आसपास रहाणा-या कांही अॕटो चालकांनी स्वतःच्या रिक्षा जश्या जमतील तश्या पार्क करून ठेवल्या .

हा तिथे जातोय..

कानोसा घेतला. आजुबाजूला कुणीच नाही हे पाहून त्याने पाहून ठेवलेल्या अॕटो रिक्षाला घेरलं .

जवळची टूल बॕग उघडून अॕटोचे टायर खोलण्यास सुरवात केली .

दोन तीन नट खोलल्या नंतर दुरून एक अॕटो येत असलेला याला दिसला..

पण , 

पण तो जरासा ही बावरला नाही .

आणि येणाऱ्या अॕटोकडे पाहिलं ही नाही ! 

त्याला त्याच्या कामगिरीवर प्रगाढ विश्वास होता .

दुरवरून येणारा अॕटो आता त्याच्या जवळ आला..

' का हुवा भैय्या..? गाडी बिघड गया है का ? ' 

आलेल्या अॕटो चा ड्रायव्हर याला विचारत होता .

" अरे यार अभी चार बजे सवारी ले जाना है..टायर पंक्चर दिखा सो बदलते बैठा हुँ । " हा बोलला .

तसा तो अॕटो ड्रायव्हर त्याची गाडी पुढे नेत ' कोई दिक्कत नही यार..बदल ले ना ' बोलून निघून गेला .

याचे काम फत्ते झाले..

आठ एक दिवसापूर्वी बदललेले व टाकलेले एम आर एफ चे दोन टायर काढून घेतले . मोठ्या बॕग मध्ये ठेवून तेथून पसार झाला. . .

      फुलपाडा विभाग..! 

गजबजलेला भाग..अनेक प्रवाशी तेथून सेंट्रल बस स्टँड कडे जाणारे..त्या गर्दीतून त्याने सावज हेरलं..अंगात नेहरू शर्ट...ट्राऊजर

डोक्यावर टोपी भाळी बुक्का लावलेला..पाठीवरच्या पिशवीत एक भगवा झेंडा .

" कुठं निघालाव माऊली..." ? 

त्याने जर हरी बोलून एका साध्या सामान्य प्रवाश्याला विचारलं .

' मुंबैत पोराला भेटाया आलो होतो..गावाकडं परत निघालोय ' 

प्रवाशी बोलता झाला .

त्याने बोलता बोलता ग्रामीण प्रवाश्याला संमोहित केलं..

     स्वतःच्या हातचालाखीने मौका साधून त्या प्रवाश्याच्या बॕगेत असलेले जेमतेम दागिणे तसेच असलेली चौदा हजाराची रोख रक्कम लांबविली आणि कळत नकळत तेथून पसार झाला ! 

      याचा हा नेहमीचा उद्योग ! 

उभ्या असलेल्या अॕटोरिक्षाचे टायर चोरायचे . कमीशनवर ठरलेल्या रिमोल्ड टायर विक्रेत्याला मुँह माँगे दाम मध्ये विकायचे 

        आणि त्याच बरोबर..

स्टँड वरच्या भोळ्या भाबड्या प्रवाश्याला हेरायचे व हातचलाखी करून त्यांची रोकड रक्कम तथा बॕगमध्ये असलेले दागिणे लंपास करायचे .

       इकडे विरार पोलिस स्टेशनला त्यांच्या हद्दीत घडलेल्या अश्या प्रकारच्या गुन्ह्याची संख्या वाढतच चालली. सदरिल एका नंतर एक नोंद होत असलेल्या गुन्याने अख्खे पोलिस स्टाफ चक्रावून गेले .

          सकाळची वेळ..

वाघुडे साहेब घरी नास्ता करून तयार झाले..अंगावर वर्दी चढवली 

तेवढ्यात त्यांचा मोबाईल फोन खणकला..

' साब किधर कू है..स्टेशन मै आएला है क्या ? मै तुमकू उधरीच मिल लेता हुँ ' 

पोलिसी खब-या जुनैद फोनवर बोलला .

" अरे बस्स निकल ही रहा हुँ " ! 

वाघुडे निष्चयपूर्ण बोलले .

पण , 

बाहेर येताच त्यांना त्यांच्या मोटारसायकलचे टायर पंक्चर दिसले .

" ओहह..शीट्  ! " स्वतःशीच पुटपुटले .

खिश्यात ठेवलेला मोबाईल काढून त्यांनी जुनैद ला फोन लावला..

' यार जुनैद ! पिछला टायर पंक्चर हुआ है..और शायद अंदर से ट्युब भी फट गया सा दिखता है । 

मुझे आने को देर लगेगी रे..' 

वाघुडे साहेबांनी जुनैद ला फोनवर सांगितले .

तसा जुनैद ..

' अरे सहाब..सस्ते में टायर मँगता है तो आपनकू बोलो..आपून दिलायेगा ।  एक पहचान वाला रिमोल्ड टायर का दुकान है ' 

वाघुडे सरांना जुनैद बोलला .

" नही मै इंतजाम करवा लुँगा । बस्स पोलिस स्टेशन आने में जरा सी देर लगेगा । " वाघुडे सर बोलले .

दुपारी दरम्यान बाराच्या सुमारास वाघुडे पोलिस स्टेशनला पोहंचले.

पण जुनैद चे वाक्य डोक्यात वादळ घालीत होते..

सस्ते मे होना है तो आपून को बोलो..

कांही क्षणातच वाघुडे साहेब घटनाक्रमाची माळ गुंफून बसले..

      टायर चोरीच्या, दागिणे तथा रोकड रक्कम च्या घटना पोलिस स्टेशन ला नोंद झालेल्या..

जुनैद चे सस्ते मे होना है तो..वाक्य .

एव्हाना सगळा प्रकार साहेबांच्या लक्षात आला .

दुपारी दोन च्या दरम्यान जुनैद स्टेशन मध्ये आल्या नंतर सखोल चौकशी झाली .

आणि ,

" किसी को भी कुछ भी नही बोलने का !

 " असा सज्जड दम देऊन जुनैद ला मानधन देऊन चूप केले .

दुसऱ्या दिवशी दि. १३ / ६ / २०२२ रोजी जुनैद च्या सांगण्यावरून एका संशयीत आरोपीस पोलिस स्टेशन ला अटक करून घेऊन आले .

संशयीत आरोपी

राहुल उमेश कदम रा. रूम नं ३०४ बी , गोविंद छाया अपार्टमेंट , साईनाथ नगर , विरार ( पूर्व )

सध्या रहाणार 

बी २०२ , साई एव्हेन्यू अपार्टमेंट ,  नाना नानी पार्क , मनवेल पाडा , विरार ( पूर्व ) ता. वसई जि. पालघर . याची चौकशी सुरू झाली .

' पोलिसी खाक्या '  दाखविताच राहुल गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून रु. ४००००/- चा मुद्देमाल हस्तगत केला गेला .

आणि ,

विरार पोलिस ठाणेः

१ ) गुन्हा नो.क्र. ४९२/२०२२

भा द वि सं ३७१ / ३४ 

२ ) ५१२/२०२२

भा दा वि सं ३७९

३ ) ४२२/२०२२

भा द वि सं ३७९

अंतर्गत तपास केला असता , 

     लोहमार्ग पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाणे मध्ये चोरीचे दोन गुन्हे तसेच विरार पोलिस ठाणे मध्ये दोन गुन्हे हे तपासा अंती निष्पन्न झाले .

सदरिल कामगिरी..

श्री प्रशांत वाघुडे पोलिस उपायुक्त परिमंडळ ०३, श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पो उपायुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेश बोराडे वरिष्ठ पो निरिक्षक दिलीप राख, पो निरिक्षक ( गुन्हे ) गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पो उप निरिक्षक संदेश राणे, पो हवा सचिन लोखंडे, संदिप शेरमाळे, पो नामदार हर्षद चव्हाण, पो शिपाई इंद्रनिल पाटिल, विशाल लोहार, रवी वानखेडे, सुनिल पाटिल, युवराज वाघमोडे, सागर घुगरकर यांनी यशश्वीरित्या पार पाडली.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे