अल्पवयीन मुलगी अचानक लापता घरच्यांवर काळजीचे सावट !!

अल्पवयीन मुलगी अचानक लापता घरच्यांवर काळजीचे सावट !!

         दिनांक २४ एप्रिल ०२२ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास मुंबई गोरेगाव पश्चिम इथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली, ह्याची तक्रार नोंद बांगुरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

          दिनांक २४ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास सिमरन फारुकी, रा ठी. तांबे गल्ली, भगतसिंग नगर, न. २ ही  अल्पवयीन मुलगी आजी कडे जाते असे आपल्या मित्रास सांगून गावदेवी गार्डन जवळ, लिंक रोड येथे गेली. परंतु रात्री खूप उशिर झाला तरी मुलगी घरी परतली नाही. मुलगी अचानक बेपत्ता झाली, म्हणून घरच्या लोकांमध्ये भीतीच सावट पसरलं आणि, तिच्या घरच्या लोकांनी बांगुरुनगर पोलीस ठाणे गोरेगाव येथे तक्रार नोंदविली आहे. आणि सदर मुलगी अल्पवयीन असुन जर कुणाला आढळल्यास बांगुरुनगर पोलीस ठाण्यात 022-28810121, अथवा सदर मुलीचा शोध घेत असलेले पोलीस उप निरीक्षक टारे यांना 8888008864 या मोबाईल नंबर वर सम्पर्क साधावा असे जनतेस आवाहन करण्यात आले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे