धग !
II धग II
अंधार काळोख चोहीकडे पायवाट दिसते अंधुकशी
चाचपडत मी कसाबसा शोधितो क्षणांतरी त्या दिवटीला.
वाटलं मी अलगद घेईल त्या संधीला उराशी ,
पापणी लावताच खाली संधिप्रकाश काजवा अंधारात विरघळला.
झुंज माझी होती माझ्याशीच मजला कळले नाही
वाटलं क्षणार्धात मी तिला कवेत घेईल,पण तो माझा ब्रह्म होता .
जीवाचं रान करून मी तिच्याशी दोन हात करत होतो.
अजून मी हार मानली नव्हती कारण माझा लक्ष्य हे नितळ होतं.
(कवी - संदीप गायकवाड)