पेच !

    मी माझा कधीच शब्दाचा हि बांद फोडला नाही

कि तुला कधी मी साकडं हि घातलं नाही
तुझ्यात एवढ बळ ते तूच करू शकतोस.
तो तूच केलेला गुंता आहे तो तू सोडल्या शिवाय राहणार हि नाही.
पण एक लक्षात ठेव तू किती हि असे खेळ खेळलास
तरी मी त्याला मात्र नक्कीच जुमनार नाही
माझा धर्म लढण्याचा आहे तो मी पाळणार
पण तुझ्यापुढे आता झुकणार नाही
कुठपर्यंत तू हे खेळ करशील माझी तर तुझ्या वरच मदार
दावणीला हंबरडा फोडिला वासरांनी
गाईला तिचे तिलाच पाय जड झाले
तू कितीहि माझी गळचेपी कर जे पूर्वी घडले
ते पुन्हा घडणार नाही
लक्षात ठेव आता पुन्हा कधी कोणी हि फासावर जाणार नाही .


कवी
संदीप गायकवाड


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे