ग आई !
का कळे ना ?
काळानेत्या झडप घातली हाहाकार माजला
का दिसेना मला कोणीच ग आई.
तुझ्या कुशी मधी शांत मी झोपलेला
का दिसेना माझ्या डोक्यावरून हात तुझा ग आई.
कोडेपडले मला सर्वत्र दिसतो अंधार
का कळे ना मला हा टाहो ! फुटलेला ग आई.
सैर वैर झाली हि तुझी लेकरं नाही उरली आता या माया
का कळे ना मला हा प्रकृतीचा कोप ग आई.
क्षणा मधी असं काय घडलं, असं कसं हे आभाळ ! फाटलं.
का कळे ना मला पावसानी घेरलं ग आई.
अंगा मध्ये हरहूरू गारठून गेलो
का मिळे ना मला तुझ्या पराची उब ग आई .
सगळीकडे पाणी हे पाणीच दिसतं
का कळे ना मला हे पाणी गळ्याला लागल ग आई.
क्षणामध्ये माझा हा श्वास थांबला
का दिसेना मला कसं कोणीच ग आई.
कवी
संदीप गायकवाड