
मुंबईत संभाजी ब्रिगेड ने दिली जिजाऊंना मानवंदना !
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेशाच्या वतीने स्वराज्यप्रेरिका, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जन्मोत्सवा दिनानिमित्त १२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.वाजता मुंबई विभागातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माॅसाहेब जिजाऊ चरणी पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन मानवंदना देण्यात आली.
संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष सागर भोसले , मुंबई प्रदेश सचिव नरेश जाधव, मुंबई प्रदेश प्रवक्ते प्रा. धनंजय आंबेरकर, मुंबई प्रदेश सह सचिव कोषाध्यक्ष मोहम्मद सलिम अन्सारी, संभाजी ब्रिगेड़ दक्षिण मुंबई जिल्हा मा. जिल्हाध्यक्ष विजय बल्लाल, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान काशिद, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
सदरचा कार्यक्रम वीर माता जिजामाता प्राणी संग्राहालय (राणी बाग), ड़ाॅ.बाबासाहेब आंबेड़कर रोड़, भायखला (पु) मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला.
मुंबई शहरातील प्रमुख कार्यकर्ते संजीवनी उपरे, अनिता शिंदे, उमेश सांवत, विनोद मास्ये, नारायण पाटील, राजेश वाड़ेकर, निलेश मोरे, रवि गायकवाड़, सलिम खान, प्रविण पाटील, अजय मोरे, रविंद्र कासारे, संतोष कदम, प्रतिक सकपाल, सुशांत बोरकर, श्रीधर कांबळे व मुलुंड़, विक्रोली, भायखला, लोअरपरळ, वरळी, घाटकोपर, भांड़ुप, अंधेरी येथील सामाजिक कार्यकर्ते व अनेक शिवप्रेमी हजर होते.