प्रेमम !!

प्रेमम्


अंधाऱ्या बेडरूममध्ये अशी पाठमोरी बसलेली ती दिसली की मागून जाऊन मिठी मारावी वाटते...

मोबाईलच्या हलक्या लाईट मध्ये तिचे सौंदर्य अजून खुलून दिसते... 

खरतर दिवस भरच बरचस बोलायचं राहून गेलेलं असत... आणि ती मोबाइल मध्ये असते... 

मी अलार्म चेक करून, मोबाइल चार्जिंग ला लावून, एखाद्या लेखाचा ड्राफ्ट तयार केलेला फायनल करत असतो, आणि मोबाईल बाजूला ठेवून देतो...

टिकटॉक'च्या विडिओ बघत ती गालातल्या गालात हसत असते... तिच्या आनंदाची सिमा तिने का आखून घेतलेली असावी ?? ऑफिसमध्ये फालतू जोकवर मोठमोठ्याने खिदळणारे आम्ही आणि गालातल्या गालात हसून स्क्रोल करणारी ती यात किती फरक आहे...

खरतर आताही तिला जोक सांगितला तर ती हसणार नाही

ती दमत असेल का दिवसभराच्या कामाने ??

 सगळेच दमतात... मीही दमतो... आणि त्यात फ्रस्टेशन लेव्हल येते.

मग माझ्या आणि तिच्यामध्ये इतका फरक कसा..?

मी मनातल्या मनात विचार करत असताना ती म्हणते, "उद्या रजा घेते रे मी, पाळीचा दुसरा दिवस नाही सहन होत मला."

यावर फक्त जवळ घेऊन बर एवढेच शब्द माझ्याकडे असतात..तिची पाठ दुखत असते..

ओटीपोट दुखत असते..

मी काय करणार अश्यावेळी..?

तीच सांगते, जरा गरम पाण्याची पिशवी देतोस का मला ?

मी मठ्ठ आहे अशावेळी वाटतं आणि सिद्धही होत...

नाही तेव्हा सुचेल त्यावर दिसेल त्यावर कविता, लेख लिहिणारा मी अशावेळी मात्र निशब्द कसा पडतो, ते अजून मला न उमगलेले कोडे आहे..तिला गरम पाण्याची पिशवी आणून दिली की आपलं काम संपल अस वाटत असत तितक्यात ती माझा हात हातात घेऊन पोटावर ठेवते..

तिच्या त्या शरीरवेदना तिच्या डोळ्यातून माझ्या अंगभर फिरू लागतात ..आपण कधी समजणार आहोत तिला ?

स्वतःला हव तस कधी वागवणार आहोत ?

तिच्या पोटावर तसाच हात फिरवत राहिला की ती निजू लागते.. हा काय चमत्कार असतो.

दोन एक मिनिटापूर्वी वेदनेने असह्य झालेली ती, डोळे मिटून शांत कशी पडू शकते.?

याच उत्तर एकच असतं- प्रेम !

प्रेमाने दिलेली, प्रेमाने केलेली एकही गोष्ट वाया जात नाही

तिला मिळणार रिलीफ हा मानसिक असतो की शारीरिक तिलाच ठाऊक.!

पण माझ्या मिठीत लहान लेकरसारखी बिलगून झोपलेल्या तिला पाहिल की, बाप असल्याचं फिल येत..

ऑरगॅनिक झुक्या।


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week