वरळी येथील बी डी डी चाळ ५२ येथे असलेल्या अंध शाळेच्या जागेवर अनधिकृत स्टाँल च वर्चस्व !!

       वरळी बी डी डी चाळ नंबर ५२ येथे  एन.एस.डी. इंडस्ट्रीयल, येथे अंधशाळा, तसेच अंध उद्योगगृह व अंध शासकीय वसतीगृह आहे. ह्या शाळेत बरेच अंध व्यक्ती शिकतात, तसेच गृह उद्योग करतात व राहतात ही.

        एन. एस. डी. गृहउधोग संस्था ही ब्रिटिश काळा पासून कार्यरत आहे. ही संस्था अंधांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन अंधांच्या पुनर्वसनाचं कार्य करीत आहे. वरळीचे आमदार श्री. आदित्य ठाकरे यांनी वरळी येथे असलेल्या जांभोरी मैदान (गांधी मैदान) ह्याचे शुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे.

        मैदानाचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे मैदाना बाहेरील स्टाँल हलविण्यात आले आहेत व मुंबई महानगर पालिकेने पर्यायी जागा म्हणून अंधशाळेच्या मेनगेट वर स्टाँल हलविले आहेत, स्टाँल मेनगेट वर हलविण्यात आल्यामुळे तेथील वसतीगृहात राहणाऱ्या अंधांना मुक्त पणे परिसरात वावरण्यास अतिशय अडचण झाली आहे. भिंतीवर लावलेल्या एरो च्या आधारे अंध फुटपाथ वरून चालत असतात. परंतु  स्टाँल लावल्यामुळे अंधांची खूप गैर सोय होत आहे. फुटपाथवरून चालण्यास, रस्ता क्रॉस करण्यास खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे, रस्ता क्रॉस करताना स्टाँलच्या मुळे कधी अपघात ही होऊ शकतो. व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

        ह्या सर्व कारणास्तव आज वसतीगृहात राहणारे अंध हे उपोषणाला बसले आहेत. अंधशाळेच्या मेननगेट वरील स्टाँल बृहन्मुंबई महानगर पालिकेने त्वरित हटवावे व अंधांना वावरण्यासाठी मोकळी जागा द्यावी अशी मागणी वसती गृहातील अंधानी बृहन्मुंबई  महापालिकेकडे केली आहे.

         तसेच वरळीचे आमदार आदित्य  ठाकरे तसेच अधिकारी यांनीही अंधांची गैरसोय होत आहे हे पाहून स्टाँल हटविण्यास सांगावे व अंधांना सहकार्य करावे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे