
आमदार श्रीमती गीता जैन यांच्या नावाने तोतयेगिरी करून पैसे मागणाऱ्या तीन जणांना काशीमीरा पोलिसांनी केली अटक !
आमदार श्रीमती गीता जैन यांच्या नावाने तोतयेगिरी करून पैसे मागणाऱ्या तीन जणांना काशीमीरा पोलिसांनी केली अटक !
काही ठकासांनी इझी पैसे कमविण्यासाठी विविध अनैतिक मार्गाचा अवलंब करून नागरिकांना फसविण्याचे मार्ग अवलंबिले आहेत. अशीच एक घटना काशीमीरा येथे घडली.
दिनांक २० डिसेंबर २१ रोजी दोन पुरुष व एक महिला अशा अज्ञात आरोपींना काशीमीरा पोलिसांनी अटक केली. दिनांक २० डिसेंबर २१ रोजी दोन पुरुष व एक महिला यांनी कट रचून एका अज्ञात आरोपीने आमीर तलहा मुखी, या हॉटेल व्यवसायीकास ठकविण्याचा कट केला. श्री. आमीर तलहा मुखी यांना २० डिसेंबर रोजी फोन करून आमदार गीता जैन यांचा पी.ए. अमन शेलार बोलत असून, आमदार गीता जैन आपल्याशी बोलणार आहेत असे सांगितले व तोतया महिलेने आमदार गीता जैन बोलत असल्याची तोतयागिरी करून "हमारे समाज में विधवा महिलाओं का शादी का प्रोग्राम रखा हैं, तो उसके लिये हमें आपसे डोनेशन चाहीये" असे सांगून पैशाची मागणी केली व हॉटेल व्यवसायिक आमीर मुखी यांच्याकडून पैसे उकळणाचा घाट केला. आमीर मुखी यांच्याकडे पैसे घेण्यासाठी अमितकुमार चंद्रकांतभाई पारेख, वय वर्ष ५४ या ठकास पाठवून फसवणुक करण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणी हॉटेल व्यवसायिक आमिर तलहा मुखी यांना संशय आल्याने त्यांनी काशीमीरा पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. दिलेल्या तक्रारी वरून काशीमीरा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा क्रमांक ८७६/२०२१ भारतीय दंड विधान कलम १२०(ब), १७०, ४१९ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपी (१) अमितकुमार चंद्रकांतभाई पारेख वय वर्ष ५४, राहणार डी-२/७६, श्रद्धा सोसायटी गोराई -१ मुंबई, मूळ राहणार जुनागढ गुजरात. यांच्याकडे पोलिसांनी सखोल तपास करून आरोपी नंबर (२) सिद्धेश सुधाकर सावंत उर्फ अमन शेलार, वय वर्ष ४२, राहणार ६०२, मानवी पँँराडाईस, नारायण स्कुल भाईंदर व (३) महिला आरोपी यांना नीष्पन्न करून, त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींची माननिय न्यायालय यांनी २० डिसेंबर २१ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त श्री. अमित काळे, परिमंडळ-१, सहायक पोलिस आयुक्त श्री. विलास सानप, मीरारोड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीमीरा लपोलीस स्टेशन श्री.संजय हजारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. योगेश देशमुख, सहायक पो. निरीक्षक टिकाराम थाटकर व त्यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.