टीआय सायकल्स लाँच करत आहे मोंत्रा सिटी अनप्लग्ड. छोट्या अंतराच्या प्रवासासाठी ई-बायसिकल्स !!
टीआय सायकल्स लाँच करत आहे मोंत्रा सिटी अनप्लग्ड. छोट्या अंतराच्या प्रवासासाठी ई-बायसिकल्स !!
मोंत्रा ई-बायसिकल्स एकदा चार्ज केल्यानंतर ३० किलोमीटरपर्यंत चालतात आणि त्यांचा कमाल वेग प्रतितास २५ किलोमीटर आहे.
मोंत्रा या टीआय सायकल्स ऑफ इंडियाच्या हाय-एण्ड परफॉर्मन्स बाइक ब्रॅण्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक बाजारात आणली आहे. छोट्या अंतराचे प्रवास आरामदायी व सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने ही बाइक खास डिझाइन करण्यात आली आहे. दैनंदिन प्रवासासाठी ई-बायसिकल्स हे परवडण्याजोगे व प्रभावी साधन ठरावी म्हणून या बाइकची किंमत २७,२७९ रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही बाइक बाजारात आणून, सार्वजनिक वाहतुकीसाठी वाट बघत थांबण्यातील गैरसोय तसेच छोट्या अंतरांचे प्रवास करताना पार्किंगसाठी जागा शोधणे आदी समस्या सोडवण्याची मोंत्राची इच्छा आहे. ही बाइक वापरकर्त्याला एक आरामदायी व सोयीस्कर राइड देऊ शकणार आहे.
मोंत्रा ई-बायसिकल हलक्या वजनाच्या मिश्रधातूच्या (अलॉय) फ्रेमवर घडवण्यात आली आहे आणि त्यामुळे ती हालचालीसाठी सोपी आहे. ड्युअल मोडमुळे वापरकर्ता त्याच्या सोयीप्रमाणे मॅन्युअल व इलेक्ट्रिक मोड वापरू शकतो. इलेक्ट्रिक ब्रेकिंग प्रणालीच्या तरतुदीमुळे ब्रेकिंग प्रभावी व सहज झाले आहे. कारण, ब्रेक वापरल्यानंतर मोटर पॉवर खंडित होते.
कोविड साथीमुळे अनेकांच्या मनात सार्वजनिक वाहतूक साधने वापरण्याबद्दल भीती आहे आणि त्यामुळे अगदी छोट्या अंतरांसाठीही ते स्वत:ची खासगी वाहने वापरतात. मात्र, वाहतूक आणि पार्किंगची परिस्थिती बघता, हा फारसा व्यवहार्य पर्याय नाही. मोंत्राने हे लक्षात घेतले आणि छोट्या अंतरावरील प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी स्वत:ची ई-बायसिकल खास डिझाइन केली. ई-बायसिकल चालवण्याचा सरासरी खर्च ७ पैसे प्रति किलोमीटर असतो. त्याचप्रमाणे ही बाइक वापरल्यास कार्बन उत्सर्जनातील व्यक्तीचे योगदान लक्षणीय रित्या कमी होते तसेच अखेरच्या उपभोक्त्यासाठी (एण्ड कंझ्युमर) प्रतीक्षा कालावधी (सार्वजनिक वाहतूक साधनांसाठी, इंधन भरण्यासाठी) अनेक तासांनी कमी होतो.
ट्युब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वेलायन सुबैया मोंत्रा ई-बायसिकल्सच्या लाँचबद्दल म्हणाले, “आपल्यापैकी बहुतेकांसाठी छोट्या अंतरावरील प्रवासाचा विभाग हा सार्वजनिक वाहतुकीच्या निवडीवर व उपलब्धतेवर अवलंबून असतो. मोंत्रा ई-बायसिकल्स बाजारात आणून आम्हाला आमच्या ग्राहकांना प्रतीक्षा कालावधीतून स्वतंत्र करायचे आहे. या बाइक्समुळे ते स्वत:ला हवे तेथे हवे तेव्हा जाऊ शकतात. वाहतुकीचे भवितव्य इलेक्ट्रिक हेच असल्यामुळे ई-बायसिकल हे शहरी प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीचे वाहतूक साधन होणार आहे. भारतातील ई-सायकल्सची बाजारपेठ २०२६ पर्यंत १२.६९ टक्के सीएजीआरसह २.०८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढणे अपेक्षित आहे, असे एका अलीकडेच झालेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. ही संभाव्यता लक्षणीयरित्या प्रचंड आहे आणि तिचा फारसा उपयोग करण्यात आलेला नाही. एक ब्रॅण्ड म्हणून मोंत्रा नेहमीच ग्राहककेंद्री राहिला आहे. भारतात सायकलमध्ये कार्बन फ्रेम सर्वप्रथम वापरण्यापासून ते जलद, सुरळीत व अधिक सोप्या वाहतुकीसाठी सायकलचे वजन कमी करण्यापर्यंत अनेक प्रयोग मोंत्राने केले आहेत. आमच्या नवीन मोंत्रा ई-बायसिकल्स उत्पादनामुळे ग्राहकांचा परिवार आणखी विस्तारेल, अशी खात्री आम्हाला आहे. छोट्या अंतराचा दैनंदिन प्रवास दर्जेदार करण्याची इच्छा असलेले आमच्या ग्राहकवर्गात नक्की सहभागी होतील.”
देश शाश्वत वाहतुकीच्या दिशेने जात असताना, टीआय सायकल्स कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने बाइक वापराचे समर्थन करते. इलेक्ट्रिक सायकलमुळे वापरकर्ता मॅन्युअल सायकलच्या तुलनेत स्वत:ला फार न थकवता मोठे अंतर कापू शकतो आणि त्याचे कार्बन उत्सर्जनातील योगदानही कमी राहते. एक किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देऊन मोंत्रा ई-बायसिकल तरुणाईला भविष्यकालीन वाहतूक व्यवस्थेचा भाग होण्यास प्रोत्साहन देत आहे.