मोटवाने तर्फे टेलीमेट्रिक्सचे धोरणात्मक संपादन करत असल्याचे जाहीर !
मोटवाने तर्फे टेलीमेट्रिक्सचे धोरणात्मक संपादन करत असल्याचे जाहीर !
जमिनीखालून जाणाऱ्या केबलमधील दोष शोधून काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष साधनांमधील बाजारपेठेतील प्रस्थापित आघाडीची कंपनी असणाऱ्या टेलीमेट्रिक्सचे संपादन करत असल्याचे मोटवाने तर्फे जाहीर करण्यात आले. या संपादन प्रक्रियेमुळे मोटवाने आता आपल्या ग्राहकांना अधिक स्मार्ट चाचण्या आणि मोजमाप सुविधा पुरवू शकणार आहे आणि त्यायोगे भारतात आणि परदेशात आपला पोर्टफोलिओ मजबूत बनविणार आहे.
जागतिक चाचणी आणि मोजमाप विश्वात भारतातील अग्रणी निर्माण करताना अनेक दशकांचा अभ्यास आणि अनुभव तसेच नाविन्यपूर्णतेबद्दल असलेली बांधिलकी यातून मोटवाने फर्मने भारतीय चाचणी आणि मोजमाप उद्योगविश्वात मोठे नाव कमावले आहे. त्यांच्या गतिशील आणि अनेकविध कुशल टीम्सच्या अथक कष्टांच्या आधारावरील ‘कल्पनांना प्राधान्य’ संस्कृतीमुळे मोटवानेने उच्च कामगिरी उत्पादन मालिका निर्माण केली आहे. अखंड सुरु असणाऱ्या संशोधन आणि विकास कामावर भर दिल्यामुळे आपली मोट- वेअर ही सॉफ्टवेअर सुविधा सादर करून त्या द्वारे मोटवानेने टेस्ट आणि मेजरमेंट (चाचणी आणि मोजमाप) प्रक्रियेचे क्लाऊडवर जाऊन डिजीटलायझेशन केले आहे. टेलीमेट्रिक्सच्या केबलमधील दोष शोधून काढणाऱ्या उत्पादन आणि व्यवस्थेमुळे मोटवानेचा उत्पादन पोर्टफोलिओ अधिक विस्तारणार आहे आणि त्याला बळकटी येणार आहे. दोन्ही कंपन्यांनी आजवर नाविन्यपूर्णतेला प्राधान्य दिले आहे आणि चांगले प्रशासन, पारदर्शक व्यावसायिक कारभार आणि ग्राहकांना सुयोग्य सुविधा पुरविण्याबाबत असलेली बांधिलकी ही मुल्ये दोन्ही कंपन्यांमध्ये समान आहेत.
“टेलीमेट्रिक्स ही खूप छान चालत असलेली कंपनी आहे आणि एक विश्वासार्ह ब्रँड आहे. मोटवाने समूहात त्यांचे स्वागत करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. या दोन्ही कंपन्या परस्परांच्या मूल्यांमध्ये भर घालतील आणि चाचणी आणि मोजमाप विश्वात भारतात अग्रणी राहून जागतिक पातळीवर सर्वोत्तम पद्धतीने स्पर्धा करू शकतील,” असे मोटवाने समूहाचे अध्यक्ष गौतम खंडेलवाल म्हणाले.
या संपादन प्रक्रियेचा लाभ दोन्ही कंपन्यांना होणार असून विकास आणि नाविन्यपूर्णता यांच्यासाठी व्यासपीठ तयार होत आहे.
मोटवाने साठी, अधिक वैविध्यपूर्ण भविष्यात वाटचाल करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक उत्साहवर्धक सहयोगी पाऊल आहे. हा एक परिपूर्ण धोरणात्मक निर्णय असून त्यामुळे कंपनीची उत्पादन मालिका, प्रेरक वाढ, बाजारपेठीय हिस्सा या सगळ्यातच सुधारणा होईल. त्याचा परिणाम म्हणून इलेक्ट्रिकल चाचणी आणि मोजमाप उद्योगात जागतिक पातळीवर महत्वपूर्ण स्थान मिळविण्याच्या मोटवानेच्या ध्येयाला बळकटी येईल. जमिनीखालून जाणाऱ्या केबलमधील दोष शोधून काढण्याच्या कामात नक्कीच विकासाला मोठी संधी आहे. झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे आणि पुनर्वापर ऊर्जा निर्मिती वितरणामुळे जमिनीखालून जाणाऱ्या भूमिगत केबलमध्ये वाढ होत आहे. मोटवानेचे भारतातील मजबूत जाळे आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय ग्राहक ही टेलीमेट्रिक्सला नवीन बाजारपेठा मिळविण्यासाठीची योग्य संधी आहे.
टेलीमेट्रिक्सच्या व्यवस्थापकीय संचालक अरुणा नारायण म्हणाल्या, “स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्यासाठी आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात एकत्र काम करताना हे अधिग्रहण हा एकदम स्मार्ट पर्याय आहे. आमच्या निष्ठावान ग्राहकांना आता आम्ही अधिक व्यापक उत्पादन सुविधा पुरवू शकू. यातील बरेचसे ग्राहक समान असताना त्यांना संशोधन आणि विकास सुविधा आणि तत्पर सेवा पुरवता येईल. व्यक्तिगत पातळीवर, माझ्याकरता, हे अभियांत्रिकी आणि जण कौशल्य यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. मग ते तांत्रिक क्षेत्र असो वा मानवी क्षमता क्षेत्र; यातून दोन्ही कंपन्यांसाठी नवीन क्षितिजे विस्तारणार आहेत.
मोटवाने विषयी
मोटवाने ही प्रभावी परंपरा आणि वारसा जपणारी आणि संशोधन आणि विकास तसेच आयओटी क्षमतांवर विशेष लक्ष देणारी भारतीय अभियांत्रिकी कंपनी आहे. ऊर्जा प्रकल्पांपासून प्लग पॉईंट पर्यंत नेहमीच्या गुणवत्ता प्रमाणांच्या पुढे जात मजबूत, विश्वासार्ह आणि चिरकाल टिकणारी त्यांची उत्पादन मालिका आहे. याचा परिणाम म्हणजे १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या नाविन्यपूर्ण, ऊर्जावान आणि ग्राहकोपयोगी सुविधांमुळे मोटवाने ब्रँडने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
टेलीमेट्रिक्स विषयी
मोटवाने कुटुंबात नव्यानेच भर पडलेल्या टेलीमेट्रिक्स तर्फे केबल मधील दोष शोधून देणाऱ्या साधनांची संपूर्ण मालिका सादर केली जाते. या साधनांमुळे पॉवर केबल्स, कम्युनिकेशन केबल्स आणि पाईप लाईन्स मधील दोष कुठे आहेत, प्रतिबंधात्मक शोध घेणे शक्य होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणाऱ्या या कंपनीचे ऊर्जा क्षेत्रात भारतात आणि परदेशातही मोठे ग्राहक आहेत.