वरळी पोलीस कॅम्प, शमा कॉटर्स येथे सापांचा सुळसुळाट !

वरळी पोलीस कॅम्प, शमा कॉटर्स येथे सापांचा सुळसुळाट !

        वरळी पोलीस वसाहत येथे एकूण ८७ इमारती असून इमारतीच्या मागील व पुढील भागा मध्ये साफसफाई करण्यासाठी सफाई कामगार (चतुर्थ श्रेणी) यांच्या पदांची संख्या रिक्त व कमी असल्यामुळे तेथे पुरेशी स्वच्छता होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास झाले असून येथील नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेच शमा कॉटर्स येथे सापांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत, त्या ठिकाणी सर्प मित्रांची नेमणूक करावी व त्याबाबतच्या समस्येचे पत्र


       युवासेना उपविभाग अधिकारी श्री. अभिजित पाटील यांनी सशस्त्र ल-विभागाचे पोलीस उप-आयुक्त श्री. संजय पाटील (I P S) यांना भेटून दिले व त्याबाबत चर्चा केली. सदर विषयावर तात्काळ कारवाई करून योग्य तो मार्ग काढेन असे पोलीस उपायुक्त पाटील यांनी आश्वासन दिले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week