वरळी पोलीस कॅम्पात उजेड पडला !

वरळी पोलीस कॅम्पात उजेड पडला !

         वरळी पोलीस कॅम्पातील स्ट्रीट लाईट गेले ९ महिने बंद असल्यामुळे पोलीस वसाहतीत सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरलेलं होतं, त्यामुळे तिथे सापांचा सुळसुळाट व चोरांचा सुळसुळाट झाला होता, त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध तिथे घाबरत घाबरत राहत होते, रात्री अपरात्री कामावरून घरी येताना पोलीस कर्मचारी पण असुरक्षित होते.


 

            तशी तक्रार युवासेना उपविभागीय अधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे तेथील स्थानिक रहिवाशांनी दिली, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अभिजित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता (विद्युत) समृद्धी सुरवसे, उप विभागीय अभियंता नरखडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जाधव यांच्या सहकार्याने वरळी पोलीस वसाहत येथील शमा कॉटर्स येथे इमारत क्रमांक ३४ ते ५४ येथे गेले अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ चालू करण्याच्या कामला सुरवात केली. त्याबद्दल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनःपूर्वक आभार मानले. सदर प्रसंगी उपशाखाप्रमुख विश्वास अव्हाड, सचिन नाईक, कमलेश सावंत, उपशाखासंघटक कल्पना सुर्वे व नितेश सांगवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week