वरळी पोद्दार हॉस्पिटल येथील कोरोना संशयित रुग्णांचे हाल !
नुकतेच असे व्हिडीओ व्हायरल झाले होते जबाबदारी कोण घेणार ?
असे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर
मा. आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार माजी आमदार सुनिल शिंदे यांनी पोद्दार हॉस्पिटलला भेट दिली व सहाय्यक अभियंता श्री. म्हस्के यांच्याशी संवाद साधून तेथील सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच पोद्दार मध्ये Quarantine असलेल्या लोकांशी फोनवर संपर्क साधून सध्या दिल्या जाणाऱ्या सर्व व्यवस्थेवर ते समाधानी असल्याचीही खातरजमा केली.
नुकताच वरळी पोद्दार हॉस्पिटल मधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यांची गंभीर दखल घेण्यात आली असून जी गैरसोय झाली होती आणि त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती, त्यांच्यावर कारवाई झाली आहे व गैरसोय झालेल्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले आहे. आमदार मा. आदित्यजी ठाकरे स्वतः या सर्वांच्या संपर्कात असून भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे.
अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.