स्वप्नात बांधलेले.....

स्वप्नात बांधलेले.....

स्वप्नात बांधलेले....

स्वप्नात बांधलेले घरटे...पडून झाले

झाले त्रयस्थ आता, झाले रडून झाले 


प्रेमी जिवास जगण्या विघ्ने किती असावी?

जे सहज साध्य व्हावे तेही नडून झाले


त्यांना कशास ठरवू नादानं घातकी मी

 जे वार शेलके ते...यारा कडून झाले


 ज्यांनी जुलूम केले त्यांना कसे कळावे 

हळुवार, कोवळेपण सारे झडून झाले


 अतृप्त राहिलेली ही आस,प्यास, तृष्णा 

 "प्रीती" असे जीवाचे हे तडफडून झाले..


               ...........   प्रीती तिवारी.........



Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week