शनिग्रह, चंद्र, तारे
शनीग्रह, चंद्र,ताऱ्यांशी जराशे फाटले होते
जीवाचे जीव त्यांचे प्रेम आता आटले होते
पणाला लावले सर्वस्व का झाले हसे त्याचे
असे नशिबात माझ्या काय हे रेखाटले होते
तुझ्या उमद्या नकाराने सख्या मी मोकळी झाले
कधीचे हुंदके माझ्या गळ्याशी दाटले होते
कशाला घातली ना बोलण्याची शपथ तू हळवी
सख्या समजून घेशील तू तरी मज वाटले होते
सख्या छाया, सख्या माया सुखाची सावली "प्रीती"
आता आयुष्य माझे मी उन्हाची थाटले होते.....
प्रीती तिवारी
मुंबई