दरोडे टाकणारी फासेपारध्यंची टोळी गजाआड !!
फासेपारधी जमातीवर पूर्वीपासूनच दरोडेखोर म्हणून त्यांच्यावर स्टॅम्प लागलेला आहे. अतिशय सफाईने ते दरोडे टाकत असतात. शरीराने काटक वेळ प्रसंगी शरीराला तेल लावून दरोडे टाकण्याचे काम करीत असतात आणि दरोडे टाकताना जर एखादी व्यक्ती त्यांच्या कचाट्यात सापडली तर त्या व्यक्तीचा मृत्यू झालाच म्हणून समजा अशी ही फासेपारधी जमात जंगलात राहणारी मागासलेल्या वर्गाची. हल्ली वसई विरार मध्ये या फासेपारधी जमातीचा दरोडे टाकण्यात धुमाकूळ चालला होता आणि अशाच या दरोडे टाकणाऱ्या एका टोळीचा विरार पोलिसांनी पडदा फाश करून त्यांना गजाआड केले.
घटना अशी की, दिनांक पाच जानेवारी रोजी गुन्हे शाखा कक्ष तीन चे अधिकारी यांना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मौजे शिरसाट फाटा येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर शसस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या फासेपारधी जमातीच्या गुन्हेगारांबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावर माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी कक्ष तीन येथील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी कारवाई करून विरार पूर्व जीवदानी मंदिर हेलीपॅड परिसरातून कुविख्यात आंतरराजिय टोळीतील आरोपी नामे मनीष उर्फ राजू मोहन चव्हाण राहणार वैजापूर जिल्हा औरंगाबाद, भाऊसाहेब शंकर गवळी राहणार तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर, रवींद्र सिंग सुखराम सोलंकी राहणार जिल्हा गुन्हा राज्य मध्य प्रदेश, सुखचेन रेवत पवार राहणार जिल्हा तालुका गुणा मध्य प्रदेश, मॉन्टी नंदू चव्हाण जिल्हा गुन्हा राज्य मध्य प्रदेश, अश्विनी रूपचंद चव्हाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेतले असून ताब्यात घेतेवेळी त्यांनी पळून जाण्याच्या उद्देशाने पोलिसांना प्रतिकार केला त्यावेळेस पोलिसांबरोबर त्यांची हातापायी झाली त्यात काही पोलीस शिपाई व अधिकारी किरकोळ जखमी झाले. परंतु मोठ्या शिताफीने पोलिसांनी सर्व दरोडे टाकणाऱ्या टोळीस पकडून ताब्यात घेतले.
दरोडे टाकण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची स्कॉर्पिओ जीप, रिक्षा तसेच काही हत्यारे जसे लोखंडी कोयता, लोखंडी सुरा, बॅटऱ्या, नायलॉनची दोरी, दोन लोखंडी कटावण्या, मिरची पूड, मोबाईल फोन व रोख रक्कम दागिने असा एकूण दहा लाख 16 हजार 356 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
तपास केलेल्या गुन्ह्यात आरोपीवर असलेले पुढील गुन्हे स्पष्ट झाले आहेत. आरोपींनी अर्नाळा सागरी पोलीस ठाणे, वाडा पोलीस ठाणे, पालघर गणेशपुरी पोलीस ठाणे, ठाणे ग्रामीण घोटी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण, ह्यांच्या हद्दीत एकत्रितपणे मिळून दरोडे घातले आहेत.
आरोपी मनीष उर्फ राजू मोहन चव्हाण यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाणे, ग्रामीण पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन अहमदनगर, विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली, किनवली पोलीस ठाणे ग्रामीण, करार शहर पोलीस ठाणे सातारा इत्यादी ठिकाणी मनीष उर्फ राजू याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी रवींद्र सुखराम सोलंकी विरुद्ध मध्य प्रदेश पोलिसांनी पाच हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. त्याने त्याचे वर घर नावदा पोलीस स्टेशन जिल्हा गुन्हा मध्य प्रदेश ठाणे जिल्हा गुणा मध्य प्रदेश घरनावदा पोलीस ठाणे जिल्हा गुन्हा मध्य प्रदेश, केट पोलीस ठाणे, जिल्हा गुना मध्य प्रदेश छिपा भरत पोलीस ठाणे जिल्हा बारा राजस्थान इत्यादी पोलीस ठाण्यामध्ये पाच गुन्हे दाखल आहेत.
आरोपी सुख चेन रेवत पवार विरुद्ध मध्य प्रदेश पोलिसांनी पाच हजार रुपयांचे इनाम जाहीर केले आहे त्यावर नमूद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. धरनावदा पोलीस ठाणे जिल्हा गुना मध्य प्रदेश, चाचवडा पोलीस ठाणे जिल्हा गुना मध्य प्रदेश असे एकूण तीन गुन्हे आरोपी सुख चैन वर दाखल आहेत.
महिला आरोपी असलेली अश्विनी रूपचंद चव्हाण हिच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे अहमदनगर, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे अहमदनगर, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे अहमदनगर, श्रीरामपूर पोलीस ठाणे अहमदनगर, इत्यादी ठिकाणी चार गुन्हे दाखल आहेत.
तसेच सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 380 भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्ह्यात उपरोक्त आरोपीचे इतर साथीदार आरोपी नामे आकाश शिवाजी पवार राहणार तालुका होटगी जिल्हा सोलापूर, गोपाल देविदास पवार राहणार तालुका होटगी जिल्हा सोलापूर, मोहन जीजू काळे राहणार तालुका होटगी जिल्हा सोलापूर, उमेश देविदास पवार राहणार तालुका होटगी जिल्हा सोलापूर, अनिता उमेश पवार राहणार तालुका होडगी जिल्हा सोलापूर यांना तसे सदर गुन्हातील सोने विकत घेणारे ज्वेलर्स राजेंद्र मूलचंद सोनी यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आली आहे.
उपरोक्त आरोपी यांचे गुन्हेगारी कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद तसेच मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश असे असून नमूद आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आला आहे. तपासा दरम्यान अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. असे पो उप आयुक्त गुन्हे श्री अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
उपरोक्त कामगिरी श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री मदन बल्लाळ सहायक पोलीस आयुक्त गुन्हे, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर, उमेश भागवत, महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना शिरगिरे, पोलीस हवालदार अशोक पाटील, सचिन ढेरे, मुकेश तटकरे, सागर बाळू, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पोलीस अमलदार राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच पोलीस अमलदार चेतन निंबाळकर, दत्ता जाधव, नेम विरार पोलीस ठाणे पोलीस अमलदार आनंद राठोड, वाहतूक शाखा विजया मंगेरी, नेमणूक नालासोपारा पोलीस ठाणे, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर सेल यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.