बाईक साठी केला डॉक्टरचा खून !

बाईक साठी केला डॉक्टरचा खून !

        खून आणि चोरी पोरखेळ होऊन बसलेला आहे. हौस मौज पूर्ण करण्यासाठी  चोरा माऱ्या करतात त्यामुळे बरेच चोरीचे प्रकार वाढले आहेत. मुंबईत हे अति गर्दीचे लोकवस्तीचे शहर आहे. मुंबईत चोऱ्या माऱ्या बऱ्याच ठिकाणी खून दरोडे हे प्रकार घडत असतात. परंतु आता महाराष्ट्राच्या काही मागासलेले जिल्हे अशा ठिकाणीही चोऱ्यामाऱ्या खून दरोडे होण्याचे प्रमाण दिसून येत आहे.

      गोष्ट आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील दिनांक 6/9/23 रोजी तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर प्रेम सिंग राजेंद्र सिंग गिरासे यांनी नुकतीच घेतलेली मोटरसायकल बजाज प्लेटिना घेऊन दराने येथे आपल्या घरी जावयास निघाले होते. डॉक्टर प्रेम सिंगचे सहकारी फिर्यादी जगदीश जयसिंग परमार व समाधान ईश्वर सिंग गिरासे हे दोघेही डॉक्टर प्रेमसिंग गिरासे यांच्यासोबत नवीन मोटरसायकल खरेदी करून घेऊन जावयास निघाले होते. परंतु त्यांच्यासोबत न जाता डॉक्टर प्रेमसिंग गिरासे यांनी स्वतः खरेदी केलेल्या नवीन बजाज प्लेटिना या मोटरसायकल वरून शिंदखेडा येथून आपले घर दराने येथे जावयास निघाले.

        परंतु डॉक्टर प्रेमसिंग गिरासे यांच्या मागावर असलेले शाम युवराज मोरे व रोहिदास मोरे आणि फुलचंद पवार या तिघांनी सोनगीर शिडखेडा रोडवर चिमठाणा सब स्टेशन जवळ डॉक्टर प्रेमसिंग गिरासे याला गाठले व सूक्ष्म धारदार चाकूने त्याच्या छातीवर हृदयावर वार केला तसेच उजव्या पायाच्या मांडीवर देखील वार केला व त्याचा खून करून त्याची बाईक मोबाईल घेऊन पसार झाले. त्यानंतर काही लोकांनी प्रेमसिंग यांना दवाखान्यात घेऊन गेले, दवाखान्यात प्रेमसिंग यास मयत घोषित करण्यात आले. सदर घटनेचा तपास करीत असताना डॉक्टर प्रेमसिंग याचा खून आरोपी शाम मोरे व आरोपी संदीप पवार यांनी केल्याचे निष्पन्न झाले असून चोरीस गेलेली मोटर सायकल व मोबाईल त्यांच्याजवळून हस्तगत करण्यात आला.

            सदर गुन्ह्याची फिर्याद शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५/२०२१, कलम ३९४,३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी केला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदरचा खटला माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश १ येथे सुनावणी सुरू झाली. सदर खटल्यात सरकारतर्फे एकूण 16 साक्षीदार यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली.

            यात फिर्यादी जगदीश परमार, दीपक बाविस्कर बाळू धनगर डॉक्टर साधना पाटील समाधान गिरासे मुकेश धनगर योगेश राजपूत, निलेश पाटील ईश्वर चव्हाण हंसराज चौधरी आशिष भामरे जितेंद्र राजेंद्र पवार आणि पोलीस निरीक्षक सुनील भाबड अशा साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब नोंदविण्यात आले. सदर प्रकरणी प्रत्यक्षात कोणताही साक्षीदार नव्हता तथापी साक्षीदार देवेंद्र विश्वासराव बोरसे व जगदीश निकम या पंच साक्षीदारासमोर दोन्ही आरोपींनी स्वतःहून गुन्हा कबूल केला. आरोपी संदीप याने दरोडा टाकून चोरलेला मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला तसेच आरोपी श्याम याने चोरून नेलेली नवीन मोटार सायकल  पोलिसांच्या स्वाधीन केली आरोपीच्या शर्टावर रक्ताचे डाग मिळवून आले. आरोपी श्याम याने काढून दिलेल्या चाकू वर मयताच्या रक्ताचे डाग व चाकू वरचे रक्त एकच असल्याचे रासायनिक विश्लेषणात दिसून आले.

           सदर खटल्यात सरकारतर्फे युक्तिवाद करताना अतिरिक्त अभियोगता ऍडव्होकेट श्री गणेश वाय पाटील यांनी साक्षीदारांची साक्ष या अभिलेखावर असलेला अहवाल व पुराव्याच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालाच्या आधारावर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केला. सदरच्या खटल्यात माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डॉ एफ एम ए ख्वाजा साहेब यांनी सादर खटल्यात असलेल्या पुराव्यावरून आरोपी श्याम युवराज मोरे, वय वर्ष 26 व संदीप फुलचंद पवार वय वर्ष 25 यांना ऐतिहासिक जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड व तो न भरल्यास सहा महिने मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. मयताचे पालक यांना नियमानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पीडित नुकसान भरपाई देणे बाबत आदेश दिलेला आहे. यात अन्य आरोपी राकेश रोहिदास मोरे यास पुण्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

           सदरची कामगिरी ऍड गणेश व्हाय पाटील तसेच सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सदर खटल्यात पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पैरवी, अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल एल आर कदम यांचे सहकार्य लाभले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी