
बायको झाली स्वस्त, पैसा झाला महाग, पैशे मागते खर्चाला म्हणून बायको झाली जड पैश्या पायी केला बायकोचा खून !!
बायको झाली स्वस्त, पैसा झाला महाग, पैशे मागते खर्चाला म्हणून बायको झाली जड पैश्या पायी केला बायकोचा खून !!
लग्न ही एक जबाबदारी असते. लग्नानंतर झालेल्या पत्नीची जबाबदारी, तिच्या ईच्छा आकांशा सांभाळणं पतीचं कर्तव्य असते. बायकोच्या गरजा ह्या पतीलाच पूर्ण कराव्या लागतात, घर खर्च करावा लागतो, पण जर अस काही झालं नाही तर घरात पती पत्नीच्या प्रेमाला तडा जाऊन त्याचे रूपांतर भांडण आणि वादात होते. मग दोघात भांडण हातापायी तर कधी रागाने कुणी एक जीव तरी देतो, अथवा जोडीदाराची हत्या करून त्याला संपवतो.
अशीच एक हत्येची घटना पती पत्नीच्या वादातून तुळींज नालासोपारा येथे घडली.
तुळींज येथे राहणारे श्री संजीव रामस्वरूप ठाकूर वय ५२ वर्ष व्यवसाय रियल इस्टेट एजंट रा. रुम नं ८, अभिमान सोसायटी चाळ, त्रिंबक बंगल्या जवळ, तुळींज नाका, नालासोपारा पूर्व यानी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की सीता सदन अपार्टमेंट, रूम नो २०४, तुळींज रिक्षा स्टॅन्ड जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ नालासोपारा पूर्व, ह्या ठिकाणी मयत नामे महिला मेघा हार्दिक राजुभाई शाह उर्फ मेघा धनसिंग तोरवी, वय अंदाजे ४० वर्ष हिचा पती हार्दिक राजु भाई शाह याने काही दिवसापूर्वी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्याची पत्नी मयत मेघा हार्दिक राजुभाई शाह हिचा खून करून तिचे प्रेत घरातील बेड मध्ये लपवून तसेच घरातील सर्व सामान विक्री करून रूमला बाहेरून कुलूप लावुन कुठे तरी निघून गेल्या बाबत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने आरोपी हार्दिक वर भारतीय दंड विधान कलम ३०२ अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नमूद खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हार्दिक राजुभाई शाह यास अटक करण्या करता वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ वसई युनिटचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या होत्या वसई २ युनिटचे प्रमुख श्री. शाहूराज रणविरे पोलीस निरीक्षक यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपिताचा शोध घेतला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी हा पश्चिम एक्सप्रेस या गाडीने प्रवास करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आरोपितास तात्काळ ताब्यात घेण्याकरीता वेळ न दवडता नागदा रेल्वे पोलीस बलाशी समनव्य साधून, आरोपी हार्दिक शाह यास नागदा जंक्शन मध्यप्रदेश येथे ताब्यात घेण्यात आले.
त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्यास कोणताही कामधंदा नव्हता. आणि घरात खर्च होणाऱ्या पैशाबाबत त्याचे पत्नीशी वारंवार वाद होत होते त्यामुळे त्याने वादाला कंटाळून पत्नी मेघा हीचा गळा आवळून खून केला व तिचे प्रेत घरातील बेड मधे लपून घरातील समान विकून रूमला ताळे मारून फरार झाला. खून हार्दिकने केल्याचे निष्पन्न झाले. म्हणून हार्दिक शाह याला आपली पत्नी मेघा हिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
सदरची यशस्वी कामगिरी श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री अमोल मांडवे सहा पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ वसई पोलीस युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूंराज रणवरे, सहा पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक फौज संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार चंदन मोरे, रमेश अलदर, जगदीश गोवारी, सचिन पाटील, सुधीर नरळे, पोलीस नाईक प्रशांत ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोरे, सर्व नेम गुन्हे शाखा २ वसई पोलीस अंमलदार राऊत, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, नेम सायबर गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक श्री पांडे आणि महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती स्मिता सोमकुवर, नेम नागदा रेल्वे पोलीस ठाणे यांनी पार पाडली.