पत्नीच्या चारित्र्यावर घेतला शक पतीनेच मारले जीवेठार !!

पत्नीच्या चारित्र्यावर घेतला शक पतीनेच मारले जीवेठार !!

        पती पत्नीच्या नात्यात संशय अतिशय वाईट असतो. संशयामुळे कितीतरी वसलेली कुटुंब उध्वस्त होतात, संशयाच भूत डोक्यात घुसले की माणूस कोणत्या नीच स्तराला जाईल सांगू शकत नाही. अशा अवस्थेत कधी मनुष्य जोडीदाराचा घात करण्यासही मागे पुढे पाहत नाही. असाच बायकोचा घात करण्याची विदारक घटना विरार पूर्व येथे घडली.

      दिनांक २ फ्रब्रुवारी-०२३ रोजी दुपारी १४ वाजता विरार पूर्व येथे असलेल्या जय जीवदानी अपार्टमेंट, रुम नं ए १०२, शंकर  पाडा नारंगी बायपास रोड, विरार पूर्व येथून  घाण वास येत असल्याची माहिती विरार पो ठाण्याला फोन द्वारे मिळताच शहनिशा करण्यासाठी विरार पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, त्याठिकाणी अंदाजे २५ ते ३० वयोगटातील एका महिलेचे प्रेत दिसून आले, सदर बाबत विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू कलम १७४ अनव्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

        मयत झालेल्या महिलेचे नाव पिंकी उर्फ प्रियंका वैभव पाटील असल्याचे समजले. परंतु पिंकीचा मृत्यू घातपाताने झाल्या असल्याच्या संशयावरून पिंकी उर्फ प्रियंका वैभव पाटील हिचे प्रेत वैदयकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टमसाठी आणण्यात आले. परंतु मृत्यूचे नक्की कारण समजण्यासाठी मयत पिंकीचे प्रेत जे जे रुग्णालय मा प्राध्यापक, न्याय वैधकीय शास्त्र भायखळा मुंबई येथे पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आले असता तिचा गळा दाबून मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. सदर बाबत पो उप नि विनोद वाघ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कोणी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३०२ प्रमाणे गुन्हयाची नोंद केली.

        परंतु सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी झालेल्या खुनाची उकल करण्याची सूचना पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिली, आदेशाचे पालन करून झालेल्या खुनाची उकल करण्यासाठी  टीम तयार करण्यात आली, वेगवेगळ्या टीम ने घटनास्थळ व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला परंतु काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत अथवा सी सी टीव्ही फुटेज मध्येसुद्धा काहीच निदर्शनास आले नाही. मिळालेल्या काही माहितीच्या आधारे मयत पिंकीचा पती वैभव पाटील ह्याचा परिवार मानिवली दुगाड फाटा, ता भिवंडी, जिल्हा ठाणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली, माहिती मिळताच पोलीस पथकाने वैभव बाळाराम पाटील याच्या गावच्या घरी धाड घातली. 

            वैभव पाटील याचे आई वडील, भाऊ बहीण यांच्याकडे विचारपूस केली असता, वैभवाचा बालपणीचा मित्र संकेत रमेश राऊत हा विरार येथे राहत असल्याची माहिती मिळून आल्याने संकेत राऊत याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली, चौकशीत असे आढळून आले, की वैभव पाटील हा त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर शक करीत होता. म्हणून वैभव पाटील याने आपला बालपणीचा मित्र संकेत राऊत याच्या मदतीने घाट घालून वैभव पाटील याने त्याची पत्नी पिंकी हिचा गळा दाबून खून केला. पिंकीच्या खुनात संकेत राऊत याचाही सहभाग असल्याने पोलिसांनी त्यालाही अटक  केली.

           परंतु महत्वाचा खुनाचा प्लानर सूत्रधार मयत पिंकीचा नवरा वैभव पाटील अजुन काही पोलिसांच्या हाती सापडला नव्हता. दिवस रात्र सापळे रचून आणि तांत्रिक विश्लेषणातून माहिती मिळाली की, वैभव पाटील हा टिटवाळा खडकवली येथील भातसा नदीच्या पुलावर कल्याण परिसरात राहत असल्याचे निदर्शनास आले, मोठ्या शिताफीने पोलीस पथकाने खडकवली भातसा नदीच्या पुलावर वैभव पाटील ह्याला ताब्यात घेतले.

               खुनात वैभवने मित्राच्या मदतीने त्याच्या बायकोचा खून केल्याचे समजले असता दिनांक ५ फेब्रुवारी ०२३ रोजी वैभवला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या. ह्या पुढील गुन्ह्याचा तपास पो नि विठठल चौगुले हे करीत आहेत.

               सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कामगिरी यशस्वी करण्यासाठी श्री सुनील बावचे पो उपायुक्त परिमंडळ ३ विरार, अति कार्यभार परिमंडळ २ श्री. रामचंद्र देशमुख, सहा पोलीस आयुक्त विरार विभाग श्री राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप राख, पो निरीक्षक गुन्हे, पो नि विठ्ठल चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहा पोलीस नि. रुपेश दळवी, पो उप निरिक्षक संदेश राणे, पो. हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, संदीप शेरमाळे, इंद्रनील पाटील, विशाल लोहार, पोलीस अंमलदार रवी वानखेडे, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सचिन ओलेकर, सागर घुरकर, दत्तात्रय जाधव, तसेच परिमंडळ ३ चे कार्यालयीन अनिल शेलार, नामदेव ढोणे यांनी पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी