
पन्नास रुपये देण्यास दिला नकार, म्हणून केला खुनाचा प्रयत्न!
पन्नास रुपये देण्यास दिला नकार, म्हणून केला खुनाचा प्रयत्न!
माणसाच्या मनात कोणत्या गोष्टीचा राग कधी धुसमुसेल याचा नेम नाही. पैशाची मागणी करून ते समोरच्या व्यक्तीने न दिल्यास त्या व्यक्तीचा खून करणं किंवा खुनाचा प्रयत्न करून दहशत निर्माण करणं हे रोड छाप गावगुंडांचं काम झालं आहे. असे खुनाचे गुन्हे रोज सर्रास घडत आहेत. एखाद्या व्यक्तीला जीवे ठार मारणे, मग अश्या ह्या गंभीर गुन्ह्याची किती दखल घेतली जाते? गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद झाल्यावर तो गुन्हा किती प्रमाणात उघडकीस येतो, किती आरोपीना शिक्षा होते, हे तर कधी कधी गूढच राहून जाते, त्यामुळे हप्ता वसूल करणारे रोड छाप गुंड यांचे चांगलेच फावते, अश्या कितीतरी घटनांची पोलीस ठाण्यात नोंद होत असेल आणि कितीतरी अशे गुन्हे लोप पावत असतील हे विचार करण्यासारखे आहे.
असाच एक गुन्हा पैशाची मागणी पूर्ण न केल्याने केलेला खुनाचा प्रयत्न पायधुनी मुंबई पोलीस ठाणेच्या हद्दीत घडला.
दिनांक १ मे ०२२ रोजी २० वाजताच्या सुमारास यलोगेट, लक्ष्मी विलास चहा टपरी समोर, पी डिमेलो रोड, पायधुनी, मुंबई या ठिकाणी अटक आरोपी याने फिर्यादी मोहम्मद हुसेन धंदा हमाली करणे याच्या कडे पन्नास रुपयांची मागणी केली. परंतू फिर्यादी यांनी आरोपीस पन्नास रुपये देण्यास नकार दिला. म्हणून अटक आरोपी याने मोहमद हुसेन शहबान खान वय वर्ष 30 रा.चाळ नं.२ बुद्ध नगर, रोड नं.१३ शिवाजी नगर, गोवडी याला लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच त्याच्या पाठीवर व छातीच्या खाली धारधार शस्त्राने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने भोसकून गंभीर दुखापत केली. म्हणून फिर्यादी मोहमद हुसेन शहबान खान याने दिलेल्या फिर्यादी वरून कलम ३०७,३३३,५०४ भारतीय दंड विधान अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.