साकी ऑर्केस्ट्रा (गणेश भवन) बारवर अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष यांची कारवाई !

साकी ऑर्केस्ट्रा (गणेश भवन) बारवर अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष यांची कारवाई !

       पैसा आला की रंगेल पुरुषांना हजार चोचले सुचतात, खाओ खुजाव बत्ती बुझाव, हा मूहावरा बरेच जण सत्यात उतरवतात. पैश्याचा रुबाब दाखविण्यासाठी, श्रीमंत वर्गाबरोबर, सामान्य माणूसही हौस मौज करण्यासाठी विशेषतः लेडीज ऑर्केस्ट्रा बार मध्ये जातात. ऑर्केस्ट्रा बार मध्ये अगदी फक्त निकरवर अर्धनग्न अवस्थेत अश्लील नृत्य  करणाऱ्या बार डान्सर ही सरस आहेत. 

             दिनांक १५ जानेवारी २२ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाचे पोलीस अंमलदार श्री. केशव शिंदे यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, साकी ऑर्केस्ट्रा (गणेश भवन) येथील बारमध्ये महिला सिंगर पुरुषांशी लगट करून हिंदी चित्रपटातील गाण्यावरती विभत्सपणे अश्लील नृत्य करून ग्राहकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतात.

           मिळालेल्या बातमीची शहानिशा करण्यासाठी व ऑर्केस्ट्रा बार च्या आडे देहविक्रीचे धंदे चालतात ह्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.एस एस पाटील व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी साकी ऑर्केस्ट्रा बार (गणेश भवन) येथे रात्री २१.४५ वाजता अचानक धडक छापा मारला असता जे दृश्य दिसलं ते अतिशय विभत्सक होत. 

             बार मधील महिला सिंगर ह्या तोकडे व उत्थान कपडे परिधान करून अर्धवट अंग उघडे ठेवून, अर्धनग्न होऊन ग्राहकां सोबत अश्लील विभत्सक नृत्य करीत असल्याचे दृष्टीस पडले. बारचे मालक/चालक, मॅनेजर कम कँशियर व वादक हे आपसात संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अश्लील धंदे करतात व महिला सिंगर ही त्यांना साथ देतात. हे आढळून आल्यावर साकी ऑर्केस्ट्रा बार (गणेश भवन) चे  मालक/चालक, कँशियर कम मॅनेजर, वादक, वेटर व महिला सिंगर व एकूण २८ ग्राहक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

       छापेमारीत एकूण १५,२८०/- रोख रुपये ही जप्त करण्यात आले आहेत. साकी ऑर्केस्ट्रा बारचे मालक/चालक, कॅशियर कम मॅनेजर, वेटर, वादक, महिला सिंगर ह्या सर्वांविरुद्ध पोलीस अंमलदार श्री. केशव शिंदे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नेमणूक, यांनी दिलेल्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. भारतीय दंड विधान कलम २९४, १०९, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

               सदरची कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री.अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संपतराव पाटील, पोलीस हवालदार उमेश पाटील, पोलीस हवालदार रामचंद्र पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई वैष्णवी यंबर, चालक पोलीस नामदार सम्राट गावडे अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष यांनी यशस्वी पणे कामगिरी पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी