
कुंकू तुझ्या नावच, सौभाग्य माझ !
कुंकू तुझ्या नावच
माझ्या कपाळावर लावल
जीवनसाथी तुलाच मी
आत्म्यातून स्वीकारलं...
माझं जगण्याचं बळ
तुझ्याच प्रेमात दिसे
माझ्या स्वप्नांची किनार
तुझ्या डोळयांत भासे..
जिवलग तू प्रियकरा
जगण्याचा श्वास असा
सोसणार मी वनवास
तुझ्या सुखासाठी तसा..
माझ अस्थित्व जीवनाचं
तुझ्यात बघ सामावलेलं
पूजते मी तुला मनोभावे
तुझ्यात मन हृदय हरवलेलं..
अभिमानाने वावरले मी
उंच मानेन या जगात
माझं लाख मोलाचं कुंकू
तूच आहे प्रिय लाखात
प्रीती तिवारी