
घरफोडी करून फरार झालेल्या नेपाळी चोरट्यांच्या टोळीला नेपाळच्या बॉर्डरवर अटक!
घरफोडी करून फरार झालेल्या नेपाळी चोरट्यांच्या टोळीला नेपाळच्या बॉर्डरवर अटक!
सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करून घरफोडी करणाऱ्या नेपाळी टोळीला बाँर्डरवरून अटक करून ५,२४,४८०/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी !
दिनांक ७ जानेवारी २२ रोजी माणिकपूर पोलीस ठाणे ता. वसई, जि. पालघर. यांच्या हद्दीत येणाऱ्या सनसिटी परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी झाली होती. माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सि.सि.टि.व्ही कँमेरे व तांत्रिक मदतीच्या आधारे तपास करण्यात आला.
सनसिटी तालुका वसई, जिल्हा पालघर येथे दिनांक ७ जानेवारी रोजी सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी करत असणारा, धरमराज दयाराम ढकाल, उर्फ शर्मा, धंदा वाँचमन, रा. मुळगाव बिनयका, नगरपालिका, वडा नो ७, कालीमाता मंदिरा शेजारी, जि, अछाम नेपाळ २) राजेश पदम जोशी, उर्फ तप्तराज पदमराज देवेकोटा, धंदा वॉचमन, रा.मुळगाव, लमकीचुआ नगरपालिका, वडा नो. २, चुलीमालिका, क्लब शेजारी, जिला, कोईलाली, नेपाळ ३) नरेश धरमराज ढकाल, धंदा वेटर, रा मुळगाव, लमकीचुआ नगरपालिका, वार्ड नो.२ मोतीपूर जिला कैलाली, आच्छाम नेपाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन घरफोडीतील एकूण १२४ ग्रॅम सोन्याचे दागिने, रु.६,८००/- रोख रक्कम व तीन मोबाईल फोन असे एकूण ५,२,४८०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी श्री. संजय कुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्री. प्रदीप गिरीधर सहाय्यक पोलीस आयुक्त वसई याच्या मार्गदर्शना खाली श्री. भाऊसाहेब आहेर वरिष्ठ पो. निरीक्षक माणिकपूर पोलीस ठाणे, पो.नि. अभिजित मडके (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, सहाय्यक पो.नि. सचिन सानप, पी. एस. आय. भोपळे, पो.उ.नि. रोहिणी डोके, पोलीस हवालंदार शैलेश पाटिल, पो. नामदार धनंजय चौधरी, पो.ना.शामेश चंदनशिवे, पो. शिपाई, गोपाळ कोळेकर, पो.शि.प्रवीण कांदे यांनी पार पाडली.