गुगल पे द्वारे पैसे स्वीकारून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुष दलाल यांना रंगेहाथ पकडले !

गुगल पे द्वारे पैसे स्वीकारून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुष दलाल यांना रंगेहाथ पकडले !

       आजकाल इझी मनी कमवण्यासाठी पुरुष आणि महिला सर्रास वेश्या व्यवसायात उतरत आहेत. पूर्वी स्त्रिया कमी शिक्षण घरची परिस्थिती हालाकीची अश्या परिस्थितीत मजबुरीने वेश्या व्यवसायात जात होत्या. परंतु आता चित्र बदललं आहे. तासाभरात इझी मनी कमविण्यासाठी हल्ली अगदी स्त्रियां सोबत कमी वयाच्या म्हणजे वीस बाविसीच्या मुली देखील स्वखुशीने वेश्या व्यवसायात उतरत आहेत.

          एखाद्या गिऱ्हाईका बरोबर गेल्यास एक तासात हौस, मौज व पैसा सर्वच मिळत म्हणून कामधंदा न करता देहविक्री करून पैसा मिळवणं म्हणजे. अश्या देह विक्री करणाऱ्या मुली व स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे. अश्या मजबुरीच्या, नावाखाली अंग मेहनतीची कामे, अथवा एखादया कंपनीत कामाला न जाता इझी पैश्यांची व देहाची वासना शमविण्यासाठी काही स्त्रिया व मुली वेश्या व्यवसाय राजरोस करीत  रस्त्यावर उभ्या असतात.

            आता गुगल पे आल्यामुळे व स्वतःला स्टॅण्डर्ड समजणाऱ्या वेश्या आता रस्त्यावर उभ्या न राहता दलाला मार्फत, लॉज वर जात असतात. अश्याच लॉज वर मुली पुरविणाऱ्या दलालांनवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथक यांनी गुन्हा दाखल केला. दिनांक १३/१/२२ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नालासोपारा तालुका वसई, जि. पालघर येथे राहणारी दिपाली मारू ही महिला व तिचा साथीदार संतोष उर्फ सॅन्डी हे वेश्यागमनाच्या मोबदल्यात गुगल पे द्वारे पुरुष गिऱ्हाईकांकडून पैसे स्वीकारून वसई, विरार व नालासोपारा परिसरातील लॉजमध्ये मुली पुरवितात. अशी माहिती मिळाल्याने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना आराम हॉटेल सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स स्टेशन रोड नालासोपारा पश्चिम तालुका वसई, जि. पालघर येथे पाठवले. 

            सत्यता पडताळून पोलीस पथकाने  छापा टाकला असता वेश्यादलाल दिपाली राजेश मारू या महिलेने बोगस गिऱ्हाईकाकडून वेश्यागमनाच्या मोबदल्यात, बोगस गिऱ्हाईकाकडून वेश्यागमनाच्या मोबदल्याची रक्कम रुपये १,०००/- कमिशन म्हणून गुगल-पे द्वारे आगाऊ स्वीकारून तिचा साथीदार संतोष उर्फ सॅन्डी याच्या मदतीने तीन मुलींना आराम हॉटेल मध्ये पाठवुन वेश्यागमनाची उर्वरित रक्कम १,०००/-रु वेश्या मुलींच्या वतीने स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने, तीन वेश्यागमन करणाऱ्या मुलींची सुटका करून वेश्या दलाल दिपाली राजेश मारु व तिचा साथीदार सँन्डी दिलीप बंगाल, वय वर्ष ३६, रा.रूम न.३०२, साई आशीर्वाद, बिल्डिंग, विमल बिल्डिंग समोर, यशवंत गौरव, नालासोपारा (प) ता.वसई, जि.पालघर यांना ताब्यात घेतले.

            सदर बाबत पो. हवालदार उमेश हरी पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपितांवर नालासोपारा  पोलीस ठाणे येथे, भारतीय दंड विधान कलम ३७०,३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा २९५६ चे कलम ४ व ५ या प्रमाणे गुन्हा दाखल केला.

            सदरची कारवाई डॉ. श्री. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल मांडवे सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे), मि. भा.व.वि पोलीस आयुक्तलाय यांच्या मार्गदर्शना खाली वपोनि. संपत राव पाटील, पो हवालदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, पोशि. केशव शिंदे, महिला पो नामदार वैष्णवी यंबर व चालक गावडे अनैतिक मानवी प्रतिबंधकक्ष भाईंदर यांनी केले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी