
चिंचोटी हायवेवर चालते वाहन थांबवून दरोडा टाकणाऱ्या टोळीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
चिंचोटी हायवेवर चालते वाहन थांबवून दरोडा टाकणाऱ्या टोळीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
चिंचोटी हायवेवर चालते वाहन थांबून दरोडा टाकणाऱ्या टोळीस गुन्हे शाखे कडून तात्काळ अटक.
दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी, पुरणसिंग ख्याली सिंग राजपूत, वय वर्ष ३१, व्यवसाय नोकरी, राहणार रम नो २१ दालमिल कंपाउंड, पेल्हार, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जिल्हा पालघर. मूळ राहणार चरसूना ता. हंमनोर, जिल्हा राजसमध, राज्य राजस्थान. हे ३ जानेवारीच्या रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान मौजे चिंचोटी गावच्या हद्दीत सातीवली खिंडीत, चिंचोटी ओव्हर ब्रीजच्या पुढे, त्यांच्या स्वमालकीचे आय टेन हे वाहन बंद पडलेल्या वाहना सोबत टोइंग व्हॅन सोबत प्रवास करीत असताना, सातीवली खिंडीत दबा धरून बसलेले ७,८ दरोडेखोर मोटार सायकल वरून अचानक समोर आले. मोटार सायकल टोइंग व्हॅन ला अडकवून टोइंग व्हॅन मध्ये घुसून पुरण सिंग राजपूत यांच्या बोटांवर कोयताने वार केला व त्यांच्या हाताची बोट घायाळ केली.
तसेच वाहनचालक प्रेमसिंग ह्याच्या उजव्या पायाच्या गुडघायवर धारधार हत्याराने जबर मारहाण करून त्यांच्याकडे १४,९०,०००/- रुपये असलेली बॅग व मोबाईल फोन असा एकूण १५,००,०००/- रुपयेचा ऐवज चोरून नेला. ह्या गुन्ह्याची तक्रार दिनांक ३ जानेवारी २२ रोजी पुरण सिंग ख्यालीसिंग राजपूत यांनी वालीव पोलीस ठाण्यात केली होती. दिलेल्या तक्रारी वरून भारतीय दंड विधान कलम ३९५, प्रमाणे दिनांक ४ जानेवारी २२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा कोणी केला या बाबत कोणतेही धागे दोरे पोलिसांच्या हाताला लागले नव्हते.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सूचना मार्गदर्शना प्रमाणे नमूद दरोड्यांच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा २ वसई युनीट चे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेळली पथके तयार करून घटनास्थळी भेट देण्यात आली, हायवेवरील घटनास्थळ असलेल्या सातीवली खिंड या ठिकाणापासून ते दहिसर चेक नाक्या पर्यंतच्या हायवेवरील सी.सी.टी व्ही कॅमेरा मधील परिक्षणातून व गुप्त बातमीदारा कडून मजेरा, ता.कुंभलगड, जि राजसमंद, राज्यस्थान या ठिकाणी राहणारा वलावतोकी भागल वय वर्ष २८ हा राज्यस्थान मध्ये राहत असल्याची माहिती वसई परिमंडळ २ मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील तपास पथकास लागली.
परिमंडळ २ गुन्हे विभाग यांनी ताबडतोब एका पथकास राज्यस्थान येथे पाठवुन आरोपी वालावतोकी भागल यास ताब्यात घेतले. नंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या व्यतिरिक्त नमूद गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी पुरुष इसम वय वर्ष २७, पुरुष इसम वय वर्ष २४, पुरुष इसम वय वर्ष ३१ रा. वडाळा मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कडून चोरलेली रक्कम व वापरलेली वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
सदर ची कारवाई श्री. डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ यांचे युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूंराज रणवरे, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित परदेशी, सहायक पो नि, सुहास कांबळे, सपोनिरी ज्ञानेश्वर जगताप, सहायक पो निरीक्षक, दत्तात्रय सरक, सपोनि अमोल आंबवणे, पोलीस हवालदार मंगेश चव्हाण, रमेश भोसले, पोह. महेश पागधारे, चंदन मोरे, सचिन पाटील, विकास यादव, पोना जगदीश गोवारी, रमेश आलदार, पोना शिवाजी पाटील, पो. कॉन्स्टेबल, अमोल कोरे, दादा अडके पो कॉन्स्टेबल, सुधीर नरळे यांनी पार पाडली.