महिलांची मंगळसूत्र व चैन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक. विरार पोलिसांची यशस्वी कामगिरी.
विरार दिनांक ११ जानेवारी २२ रोजी गुन्हे प्रकटीकरण कक्ष विरार यांच्या अनुषंगाने श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग, मिरा- भाईंदर, वसई- विरार शहर (गुन्हे) यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती.
घटना अशी की अजय किरण शहा वय वर्ष २२ हा सराईत आरोपी हा ४ वर्षां पासून फरार होता, सकाळी मॉर्निंग वाँक ला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन पाठीमागून मोटारसायकल वरून येऊन खेचून फरार व्हायचा. आरोपी मोबाईल वापरत नव्हता तसेच वारंवार जागा बदलत असल्याने त्याला पकडणं मुश्किल होऊन बसलं होत. गुप्त बातमीदारा मार्फत अशी माहिती मिळाली की त्याची पत्नी गरोदर असून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. ठाणे जिल्हा, वसई तालुका येथे रजिस्टर चेक केले सरते शेवटी पालघर जिल्ह्यातील एका रुग्णालयात तीची नोंद सापडली. त्या अनुषंगाने सी.पी. दाते, जयकुमार, वागुंडे, विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.वऱ्हाडे, डिटेक्सशन ब्रँच चे श्री टेलर, पी एस आय श्री राणे व त्यांच्या पूर्ण टिम ने सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपी अजय किरण शहा यास सातपाटी तालुका, जिल्हा पालघर येथून अटक केली.
आरोपी अजय किरण शहा याच्यावर सीआर १२/३३ प्रमाणे सहा चैन चोरीचा गुन्हा दाखल होता. तसेच ज्या मोटारसायकल वरून तो चोरी करायचा त्यातील दोन बाईक व दोन पांढऱ्या रंगांच्या स्कुटी, सहा चैन मंगळसूत्र असा पाच लाख वीस हजाराचा माल पोलिसांनी हस्तगत केला.