
दोन टोळींच्या वादातून आरोपी वर झाडल्या गोळ्या, आरोपी जागीच ठार.
दोन टोळींच्या वादातून आरोपी वर झाडल्या गोळ्या, आरोपी जागीच ठार.
जोधपूर सिटी पूर्व रातानाडा पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ३०२,३३२,३५३,३०७,३४,१२० (ब) सहा आर्म अँक्ट- ३,२५,२७ अनव्ये, दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी, राजस्थान पोलिसांच्या ताब्यात असलेला कैदी आरोपी कालुपरी उर्फ प्रदीपपुरी शंकरपुरी गोस्वामी वय वर्ष ३१, यास मा. न्यायालय पाली येथे, पेशीसाठी हजर करण्यात आले होते. नंतर आरोपीला मा. न्यायालयातून मध्यवर्ती कारागृह जोधपूर येथे घेऊन जात असताना, भाटी चौराह येथे अचानक दोन अनोळखी इसम मोटारसायकल वरून आले व पोलीस व आरोपी यांच्यावर सहा गोळी फायर करून मोटारसायकलवरून पळून गेले होते. त्यातील तीन गोळ्या आरोपी, कालपुरी शंकरपुरी गोस्वामी यास लागल्याने तो जागीच ठार झाला होता. सदरचा गोळीबार हा दोन टोळ्यामधील वादातुन झाल्याने सदर बाबत गुन्ह्याची नोंद झाली होती.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने राताननाडा पोलीस ठाणे येथील पो.उप निरीक्षक भवरसिंग व एक अंमलदार यांनी वालीव पोलीस ठाण्यात येऊन पोलीस मदत मिळावी याबाबत रिपोर्ट दिला व सदर आरोपी हा दोन टोळी युद्धातील महत्वाचा सूत्रधार होता. आरोपी सूत्रधार हा महत्वाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस सदर राज्यस्थान पोलिसांना मदत करण्याचे आदेश जारी केले होते.
वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक व राज्यस्थान यांचे संयुक्त पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हेगारांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून, आरोपीच्या कॉलरची माहिती प्राप्त केली. कॉलर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपी १० मिनिटांपूर्वी बोरिवली मुंबई बाजूकडे गेला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून, बोरीवली येथील एम.सी.एफ.गार्डन येथून आरोपी शिवरतन उर्फ प्रिन्स भवरसिंग राजपूत, रा. राज्यस्थान यास ताब्यात घेण्यास यश मिळवले व आरोपीस पुढील चौकशीसाठी राज्यस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी श्री. संजय कुमार पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ -२ वसई, श्री.पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश फडतरे, पोलीस नामदार मनोज मोरे, मुकेश पवार, पोलीस नामदार किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पोलीस अंमलदार गजानन गरीबे, सूर्यकांत मुंढे, सचिन खुताल, जयवंत खंडवी यांनी उत्तम रित्या केली आहे.