पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या !!

पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या !!

       वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नायगाव भागात राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी फरार पतीला सुरत वरून अटक केली.

     वसई पूर्व भागातील खुताडी पाडा येथे राहणारी नीलम देवी रमेश महतो, वय वर्ष (२७) ही तिचा पती रमेश महतो वय वर्ष (३०) ह्याच्या सोबत राहत होती. ह्या दोघांमध्ये काही कारणामुळे वाद निर्माण झाला. त्या वादातुन रमेश याने २९ नोव्हेंबर रोजी आपल्या पत्नीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. त्या नंतर रमेश फरार झाला. याबाबतची माहिती वालीव पोलिसांना मिळाल्यानंतर  पोलिसांनी घटना स्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. ह्या बाबत हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. रमेश फरार झाल्याने त्याच्या ओळखीच्या व्यक्तींची चौकशी सुरू होती.

    मात्र त्यावेळी पोलिसांना गुप्त माहितीदारांमार्फत रमेश सुरत येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अवघ्या काही तासात शोध घेत सुरत येथे आपल्या मित्राच्या घरी लपून बसलेल्या रमेशला पोलिसांनी अटक केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week