
भिकारी !!
तो वेडा भिकारी म्हणून हजार चिडवतात.!
त्याचा तडफडीचा विचार कधी करतात.!
शिळ्या अन्नालाही मानते पक्वान .
तरी खडे मारुन करतात बेभान.
पण कधी विचार करत नाही त्याच्या मनाचा..
विचारत नाही कोणी पत्ता त्याचा घराचा..
साथ कोण देई त्या भिकाऱ्याची.
त्याला ही गरज असते थोड्या मायेची.
त्याला कोण कधी घेत घरात.
पाहत नाही कोणी डोकाऊन मनात.
तो राहतो जरी समोर पारावरती.
त्याच्यानी आपल्यात हजार भिंती.
...राहुल लोखंडे...